नऊ आदर्श शिक्षक व गुणवंतांचा सत्कार

By Admin | Updated: September 9, 2016 02:06 IST2016-09-09T02:06:43+5:302016-09-09T02:06:43+5:30

शिक्षण विभाग जि.प. प्राथमिकतर्फे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ६ सप्टेंबर रोजी घेण्यात आला.

Nine ideal teachers and quality honors | नऊ आदर्श शिक्षक व गुणवंतांचा सत्कार

नऊ आदर्श शिक्षक व गुणवंतांचा सत्कार

जि.प.सभागृहात कार्यक्रम : जिल्ह्यात स्मार्ट विद्यार्थी घडविण्याची अपेक्षा
गोंदिया : शिक्षण विभाग जि.प. प्राथमिकतर्फे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ६ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. या कार्यक़्रमात जिल्ह्यातील नऊ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. अध्यक्षा उषा मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी होते. यावेळी अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्षा रचना गहाणे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, कृषी व पशु संवर्धन सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, जि.प. सदस्य प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा अधिकारी व नक्षलग्रस्त असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शिक्षकांच्या सहभागाशिवाय हे काम अशक्य आहे. जि.प. शाळातून स्मार्ट विद्यार्थी घडावेत असा आम्हचा माणस आहे. शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडविण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. शिक्षण व शिक्षक हा समाजाचा अविभाज्य घटक असून शिक्षकांच्या अध्ययन व अध्यापनातूनच सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे कार्य होते. त्यामुळे आदर्श शिक्षक हा पुरस्कार त्यांच्या कामाचा गौरव आहे, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे म्हणाल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
दरम्यान, अतिथींच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून प्राथमिक विभागात गोंदिया तालुक्यातून सुनंदा रमेश ब्राम्हणकर, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा अर्जुनी, आमगाव तालुक्यातून सुरेश फोगल कटरे, जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पिपरटोला, सालेकसा तालुक्यातून राधेश्याम गेंदलाल टेकाम जि.प. हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा पांढरी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातून अशोक श्रावण नाकाडे मुख्याध्यापक जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा चान्ना-बाक्टी, सडक अर्जुनी तालुक्यातून उत्तम केवळराम बन्सोड जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा धानोरी, गोरेगाव तालुक्यातून हरिराम केशव येळणे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा जानाटोला तर सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार आमगाव तालुक्यातील पुष्पलता लोकचंद क्षीरसागर, जि.प. प्राथमिक शाळा ढिवरटोला यांना देण्यात आला.
माध्यमिक विभागातून सालेकसा तालुक्यातून जि.प. हायस्कूल कावराबांध येथील भुवनेश्वर बंडूजी सुलाखे तर सडक अर्जुनी तालुक्यातून जि.प. हायस्कूल सडक अर्जुनी येथील दुधराम पांडुरंग डोंगरवार यांना गौरविण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, विस्तार अधिकारी निलकंठ सिरसाटे, महेंद्र मोटघरे, लंजे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nine ideal teachers and quality honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.