पुढील आठवड्यात होणार सॅटेलाईट सर्व्हे
By Admin | Updated: May 29, 2014 02:29 IST2014-05-29T02:29:29+5:302014-05-29T02:29:29+5:30
शहराच्या सूर्याटोला परिसरातील बांधतलाव दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान मोठी समस्या निर्माण करते.

पुढील आठवड्यात होणार सॅटेलाईट सर्व्हे
गोंदिया : शहराच्या सूर्याटोला परिसरातील बांधतलाव दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान मोठी समस्या निर्माण करते. या तलावाचे पाणी शहराच्या अनेक भागात शिरते. त्यामुळे अनेक दिवसांपर्यंत नागरिक समस्याग्रस्त राहतात. याबाबत आता सॅटेलाईल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. इटियाडोह विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, बांधतलावाच्या पुरामुळे होणार्या नुकसानीच्या क्षेत्रात सॅटेलाईट सर्वेक्षण करण्यात येईल. हे सर्वेक्षण पुणेच्या एस.के. इंजिनिअरिंग कंपनीस देण्यात आले आहे. या कंपनीच्या वतीने पुढील आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सॅटेलाईट सर्वेक्षणाच्या आधारावर ब्ल्यू झोन व रेड झोन घोषित करण्यात येतील. मुख्यत: २५ वर्षापेक्षा अधिक कालावधी बनविलेल्या घरांना ब्ल्यू झोनमध्ये समावेश करण्यात येईल. १00 वर्षापूर्वी बनलेल्या घरांना रेड झोनमध्ये दाखविण्यात येईल. सदर विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे यांनी लोकमतला सांगितले की, बांधतलावाच्या पूरक्षेत्राचा प्रामुख्याने सर्वेक्षण होईल. या सर्वेक्षणाच्या आधारावर अतिक्रमण सिद्ध झाले तर जे घर अतिक्रमणात येतात त्यांना हटविणे शासनाचा उद्देश्य आहे. विशेष म्हणजे बांधतलावात येणार्या पुरामुळे अनेक वस्त्या जलमय होतात. कार्यकारी अभियंता एन.के. ढोरे यांच्यानुसार, बांधपासून एक नाला वाहतो. या नाल्याच्या जवळ किती घर तयार करण्यात आले आहे. किती ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. याची माहितीसुद्धा सदर सर्वेक्षणात समोर येईल. या सर्वेक्षणाची रिपोर्ट मिळाल्यानंतर ती जिल्हाधिकार्यांकडे सोपविण्यात येईल. सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश्य नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविणेसुद्धा आहे. हे अतिक्रमण भविष्यात शासनाकडून हटविले जावू शकते. काही जणांना सदर अतिक्रमण किंवा त्यांचे खरेदी केलेल्या घर-जमिनीचा मोबदलासुद्धा शासनाकडून दिला जावू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणासाठी एस.के. इंजिनिअरिंग कंपनीला कंत्राट दिले आहे. निविदा आमंत्रित करण्यात आली आहे. दिलेल्या कंत्राटानुसार २६ लाख रूपये सदर कंपनीला द्यावे लागेल. वास्तव म्हणजे शासनाने या कामासाठी ३४ लाख रूपये मंजूर केले आहेत. (प्रतिनिधी)