दृष्टीदोषाच्या रुग्णांना मिळणार नवी दृष्टी
By Admin | Updated: November 17, 2014 22:56 IST2014-11-17T22:56:22+5:302014-11-17T22:56:22+5:30
डोळे म्हणजे चेहऱ्याच्या सौदर्याचे मुख्य अंग. तिरळे डोळे असणाऱ्यांना केवळ आपले शारीरिक सौंदर्यच गमवावे लागते असे नाही तर अनेकांसाठी ते चेष्टेचा विषय ठरतात. हे टाळण्यासाठी केटीएस

दृष्टीदोषाच्या रुग्णांना मिळणार नवी दृष्टी
गोंदिया : डोळे म्हणजे चेहऱ्याच्या सौदर्याचे मुख्य अंग. तिरळे डोळे असणाऱ्यांना केवळ आपले शारीरिक सौंदर्यच गमवावे लागते असे नाही तर अनेकांसाठी ते चेष्टेचा विषय ठरतात. हे टाळण्यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांचा तिरळेपणा दूर करून त्यांनी नवीन दृष्टी आणि सौंदर्य देण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी १६ विद्यार्थ्यांची निवड केली असून त्यात मुले-मुलींचा समावेश आहे.
बालवयात केलेल्या या शस्त्रक्रियेतून तिरळेपणा जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आणला जातो. त्यासाठी अशा शस्त्रक्रियेत निष्णात असणाऱ्या देशातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांपैकी एक असलेल्या नागपूरच्या डॉ.स्वर्णा बालंकी व त्यांची चमू मनोभावे येथे सेवा देत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवी धकाते यांनी दिली.
१६ नोव्हेंबर रोजी सर्वशिक्षा अभियान व राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाच्या समन्वयातून तिरळेपणा असलेल्या ५ विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केटीएस सामान्य रुणालयात करण्यात आली. यापूर्वी दि. ७ रोजी जिल्ह्यातील एकूण ४० विद्यार्थ्यांची शस्त्रक्रियापूर्व तपासणी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सल्ल्याने गोंदियात करण्यात आली.
त्यापैकी १६ विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया करण्याकरिता निवड करण्यात आली. त्यामधून पहिल्या टप्यात ५ विद्यार्थांची शस्त्रक्रिया करण्यात आली.
यामध्ये रुपाली संजय रहांगडाले (४) रा.अंजोरा ता. आमगाव, प्रज्वल बावणे (१२) धामनगाव पो.कट्टीपार बनगाव ता. आमगाव, अंकुश सिध्दार्थ साखरे (८) वार्ड नं. ०३, देवरी, साहील सदानंद कटरे (०८) लक्ष्मीबाई वॉर्ड बेलाटी, तिरोडा, दामोदर माणिक रहेले (१४) चिग्गी ता.सडक/अर्जुनी यांचा समावेश आहे.
सदर शस्त्रक्रियेकरिता विद्यार्थ्याना घरून आणण्यापासून तर शस्त्रक्रियेनंतर त्यांना घरी सुखरूपपणे पोहोचून देण्यापर्यंतचा सर्व खर्च राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातून सरकारच्या वतीने केला जात आहे. सदर शस्त्रक्रियेसाठी सर्वशिक्षा अभियान समावेशीत शिक्षण जिल्हा पषिद गोंदिया व सक्षम समदृष्टी समविकास केंद्र नागपूर तसेच शाखा गोंदिया व बाल स्वास्थ कार्यक्रम गोंदिया यांचे सहकार्य मिळाले आहे.
सदर शस्त्रक्रिया डॉ.स्वर्णा बालंकी (नेत्र शल्यचिकित्सक) व त्यांची चमू नागपूर तथा डॉ.आनंद इसरका (बधीरीकरण तज्ज्ञ), डॉ. राजेंद्र अग्रवाल (नेत्र शल्यचिकीत्सक), डॉ. धिरज लांबट (नेत्र शल्यचिकीत्सक), पटले (नेत्र तपासणी अधिकारी), उंदिरवाडे (नेत्र तपासणी अधिकारी) यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
सदर शिबिरासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रवि धकाते, प्राचार्य डवरे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, सर्वशिक्षा अभियान तथा विजय ठोकने, जिल्हा समन्वयक सर्व शिक्षा अभियान प्रियंका मडामेकर व अनिरूध्द शर्मा तसेच सक्षम समदृष्टी समविकास केंद्राच्या गोंदिया शाखेचे पदाधिकारी शिरीष दारव्हेकर (संचालक) आनंद सहस्त्रबुध्दे (अध्यक्ष) नागपूर तथा गोंदिया शाखेचे अध्यक्ष प्रभाकर राव, जागेश निमोरकर (सचिव), अतुल शाह (कोषाध्यक्ष), दिनेशभाई पटेल, कमल चिपेकर आदींनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)