न्यू नागझिरा, कोकाने भरली पर्यटनाची तिजोरी

By Admin | Updated: January 6, 2015 23:02 IST2015-01-06T23:02:35+5:302015-01-06T23:02:35+5:30

गोंदिया-भंडारा पर्यटन सर्किटमध्ये प्रामुख्याने नागझिरा, न्यू नागझिरा, कोका अभयारण्य व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. डिसेंबर २०१४ या एकाच महिन्यात नागझिरा, न्यू नागझिरा व कोका

New Nagzira, Coca-Cola Tourism Furnishings | न्यू नागझिरा, कोकाने भरली पर्यटनाची तिजोरी

न्यू नागझिरा, कोकाने भरली पर्यटनाची तिजोरी

देवानंद शहारे - गोंदिया
गोंदिया-भंडारा पर्यटन सर्किटमध्ये प्रामुख्याने नागझिरा, न्यू नागझिरा, कोका अभयारण्य व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. डिसेंबर २०१४ या एकाच महिन्यात नागझिरा, न्यू नागझिरा व कोका अभयारण्यास तीन हजार ४३३ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून दोन लाख ३८ हजार ८६० रूपयांचा महसूल वन्यजीव विभागाला मिळाला.
राज्यातील पर्यटकांसह परप्रांतीय पर्यंटकही येथे निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. आॅन लाईन बुकींगच्या माध्यमातून नागझिरा, न्यू नागझिरा व कोका अभयारण्यात सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात एकूण तीन हजार ४३३ पर्यटकांनी भेटी दिल्या आहे. त्यासाठी एकूण ४९६ वाहनांचा उपयोग करण्यात आला. पर्यटकांद्वारे मिळालेल्या शुल्कातून एकूण एक लाख ४६ हजार ७१० रूपयांचा महसूल जमा झाला. तर तिन्ही पर्यटन स्थळी उपयोगात आणलेल्या ४९६ वाहनांद्वारे एकूण ७१ हजार ६०० रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. याशिवाय न्यू नागझिरा अभयारण्यात २५५ कॅमेऱ्यांचा उपयोग करण्यात आला. त्याद्वारे २० हजार ५५० रूपयांचा महसूल प्राप्त झाला.3
यात नागझिरा अभियारण्याला एकूण ३६४ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून १४ हजार ६२५ रूपयांचा महसूल गोळा झाला. तर तेथे उपयोगात आणलेल्या ६७ वाहनांद्वारे आठ हजार ५५० रूपये सदर विभागाला प्राप्त झाले. नागझिरा अभयारण्य पर्यटनातून २३ हजार १७५ रूपयांचा महसूल संबंधित विभागाला प्राप्त झाला.
न्यू नागझिरा अभयारण्याला एकूण दोन हजार ८४८ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून एक लाख २५ हजार ६९५ रूपयांचा महसूल जमा झाला. त्यासाठी पर्यटकांनी ३८८ वाहनांचा उपयोग केला. त्याद्वारे ५८ हजार ९५० रूपये गोळा झाले. त्यात पर्यटकांनी वापरलेल्या २५५ कॅमेऱ्यातून २० हजार ५५० रूपये मिळाले. न्यू नागझिरा अभयारण्याच्या पर्यटनातून डिसेंबर महिन्यात एकूण दोन लाख पाच हजार १९५ रूपयांचा महसूल सदर विभागाला प्राप्त झाला.
तसेच कोका अभयारण्याला एकूण २२१ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्याद्वारे सहा हजार ३९० रूपयांचा महसूल जमा झाला. शिवाय वापरलेल्या ४१ वाहनांतून चार हजार १०० रूपये गोळा झाले. डिसेंबर महिन्यात कोका अभयारण्याच्या पर्यटनातून १० हजार ४९० रूपयांचा महसूल सदर विभागाला मिळाला.

Web Title: New Nagzira, Coca-Cola Tourism Furnishings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.