नवीन जिल्हा क्षयरोग अधिकारी रूजू
By Admin | Updated: July 24, 2015 01:14 IST2015-07-24T01:14:41+5:302015-07-24T01:14:41+5:30
बऱ्याच कालावधीपासून चर्चेचा विषय असलेल्या जिल्हा क्षयरोग केंद्राचे ग्रहण आता दूर झाले आहे. येथे नवीन जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून बुधवार (दि.२२) डॉ. आर.पी. गहलोत रूजू झाले.

नवीन जिल्हा क्षयरोग अधिकारी रूजू
गोंदिया : बऱ्याच कालावधीपासून चर्चेचा विषय असलेल्या जिल्हा क्षयरोग केंद्राचे ग्रहण आता दूर झाले आहे. येथे नवीन जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून बुधवार (दि.२२) डॉ. आर.पी. गहलोत रूजू झाले.
रखडलेली पदभरती, कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन व प्रलंबित भत्ते, मनुष्य बळाअभावी क्षयरूग्णांचा मृत्यू आदी अनेक बाबींनी जिल्हा क्षयरोग केंद्र ग्रासले होते. त्यातच प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वीच सदर पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा क्षयरोग केंद्र परिसरात होती. नवीन अधिकारी डॉ. गहलोत क्षयरोग केंद्रातील सर्व समस्या व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवतील व कमी मनुष्यबळाची पूर्तता करून क्षयरोग कार्यक्रम योग्यरित्या राबतील या आशेने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन (आरएनटीसीपी) सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आरएनटीसीपी कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय सचिव व गोंदिया जिल्हाध्यक्ष पवन वासनिक, भोजेंद्र बोपचे, संजय रेवतकर, रामचंद्र लिल्हारे, ए.एन. लोणारे, एच.ए. चौधरी, पी.एस. नगराडे, अरविंद गजभिये, हेडाऊ, चुऱ्हे, मुळे आदी कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)