शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
2
अमेरिका-आयर्लंड सामना रद्द केल्याची घोषणा झाली अन् नंतर आला ट्विस्ट; ५-५ षटकांची मॅच
3
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
4
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
5
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
6
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
8
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
9
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
10
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
11
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
12
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
13
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
14
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
15
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
16
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
17
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
18
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
19
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
20
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...

नागपूर-बिलासपूर रेल्वे प्रवासात प्रचाराची नवी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 9:29 PM

नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडी तुम्ही प्रवास करीत असाल तर तुम्हालाही एका विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थक आपल्या पक्षाची भूमीका समजावून सांगतील. गत काही दिवसांपासून एक चार ते पाच जणांचे पथक या प्रवासात राजकीय चर्चा करून एक प्रकारे आपल्या पक्षाचा प्रचारच करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडी तुम्ही प्रवास करीत असाल तर तुम्हालाही एका विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थक आपल्या पक्षाची भूमीका समजावून सांगतील. गत काही दिवसांपासून एक चार ते पाच जणांचे पथक या प्रवासात राजकीय चर्चा करून एक प्रकारे आपल्या पक्षाचा प्रचारच करीत आहे. जणू प्रवासी रेल्वेगाडी त्यांच्यासाठी निवडणूक प्रचाराचे माध्यम झाले आहेत.नागपूर-रायपूर व बिलासपूर दरम्यान दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. प्रवाशादरम्यान अनेकजण राजकीय विषयावर चर्चा करतात. गत आठ दिवसांपासून एका राजकीय पक्षाचे समर्थक नागपूर रेल्वेस्थानकावरून प्रवाशी गाडीत बसतात. चार ते पाच जणांचे हे पथक प्रवासादरम्यान निवडणुकीची चर्चा करतात. त्यानंतर एका विशिष्ट पक्षाची विकासात्मक कामे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रभाव सांगनू प्रवाशांना बोलते करतात. प्रवासांची व्यक्तीगत माहिती घेतात. संबंधित खासदार किती सक्रीय आहे, याची माहिती घ्यायला हे पथक विसरत नाही.३० ते ४० वयोगटातील असलेले हे तरूण प्रथम हिंदीतून संवाद साधतात. सहज वाटणारा हा संवाद आचारसंहितेत बसतो काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रचारासाठी ही नवीन शक्कल लढविण्यात आली असून आपली ओळख पटू नये म्हणून दर दोन तीन दिवसांनी पथकातील सदस्य बदलत असल्याची माहिती आहे.आता ही चर्चा आचारसंहितेत बसते की भंग करते असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकrailwayरेल्वे