आठ अपघातानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 21:46 IST2017-09-08T21:46:26+5:302017-09-08T21:46:47+5:30

आठ अपघातानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : टिप्परने स्कूल बसला दिलेल्या धडकेत आठ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.८) गोंदिया पांगोली नवीन रिंगरोड मार्गावर घडली. ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथील ही आठवी घटना आहे. या मार्गाचे काम काही प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.
शुक्रवारी टिप्पर आणि स्कूल बसचा अपघात ज्या ठिकाणी घडला त्यापासून काहीच अंतरावर छोटा गोंदिया वस्ती आहे. या परिसरातून जाणाºया बायपास मार्गाचे थोडेसे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गाचे अद्यापही लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे यापूर्वी देखील येथे अपघाताच्या सात घडल्या आहेत. शुक्रवारी घडलेली अपघाताची घटना ही आठवी घटना होती. सुदैवाने या अपघातात कुठलेही जीवीत हाणी झाली नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला अजून या मार्गावर किती अपघातांची प्रतीक्षा आहे. या मार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला. ज्या ठिकाणी अपघाताची घटना घडली त्यापासून काही अंतरावर विद्युत खांब आहे. यापूर्वी देखील एका वाहनाने या विद्युत खांबाला धडक दिल्याने तो वाकला आहे.परिणामी विद्युत तारा देखील खाली लोंबल्या आहेत. त्यामुळे येथे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.माजी नगरसेवक विष्णू नागरिकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की या मार्गावर आधी विद्युतीकरणाचे काम करण्यात आले. पण, रस्त्याचे काम पूर्ण करण्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. नवीन रस्त्याच्या कामामुळे रस्त्याची उंची वाढली असून लोबंलेल्या विद्युत तारांमुळे या मार्गावरुन ये-जा करणाºयांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात चार ते पाच वेळा निवेदन देण्यात आले. पण त्याची सुध्दा अद्याप दखल घेण्यात आली नाही. या मार्गावरील वाकलेले विद्युत खांब त्वरीत न हटविल्यास या विरोधात तीव्र आंदोलन धेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
गतीरोधकाची गरज
गोंदिया-नवीन रिंगरोड मार्गावर गतीरोधक असते तर अपघाताची घटना टाळता आली असती. या मार्गावरुन स्कूल बसेससह इतरही वाहनाची वर्दळ असते. वाहनांची संख्या आणि रस्त्यालगत असलेली नागरी वसाहत लक्षात घेऊन या मार्गावर गतीरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ते विद्युत खांब हटविणार
छोटा गोंदिया परिसरातील मार्गावरील वाकलेल्या विद्युत खांबासंदर्भात वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता जीजोबा पारधी यांच्याशी संपर्क साधला असता वाकलेले खांब त्वरीत बदलविण्यात येतील. तसेच रस्त्याच्या दुर्तफा दोन विद्युत खांब लावण्यात येणार असल्याचे सांगितले.