शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्माण नळ योजनेला जलशुद्धीकरण यंत्राची गरज

By admin | Updated: May 9, 2016 01:53 IST

येथील नवनिर्माण होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी मिळत आहे.

आरोग्य धोक्यात : क्षारयुक्त पाण्याने बळावतोय आजार रावणवाडी : येथील नवनिर्माण होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी मिळत आहे. बदलत्या जल वायू प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला एका मागून एक आजार उद्भवत आहेत. ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता पाणी पुरवठा योजनेत जल शुद्धीकरण यंत्र बसविणे गरजेचे आहे.शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण भागात नाही. पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासणी होत नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. रावणवाडी गावालगत नदी नाले नसून बोर किंवा विहिरीचेच पाणी प्यावे लागते. हे क्षारयुक्त पाणी पेल्याने गावकऱ्यांचे आयुष्यच काळवंडले आहे. क्षारयुक्त पाण्याने दातांच्या तक्रारी देखील वाढल्या असून कमरेचे व गुडघ्याचे आजारही जडले आहेत. मात्र याकडे प्रशसनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची खंत गावातील नागरिकांनी केली आहे.रावणवाडी येथील ग्रामस्थ शेती, मोलमजूरी काही लघू व्यवसाय करुन आपली उपजिवीका करतात. अंदाजे ३ हजार लोक या गावातील ग्रामस्थांना जल शुद्धीकरणाची प्रक्रिया न करताच पाणी पुरवठा केला जाणार आहे. अनेक वर्षापासून क्षारयुक्त पाणी प्यावे लागत असल्याने संपूर्ण गावातील अनेक नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन नवनिर्माण होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पूर्वीपासूनच क्षारयुक्त पिण्याचे पाणी वापराने अनेक ग्रामस्थांना दाताचे आजार जडले आहेत. अनेकांना या क्षारयुक्त पाण्यामुळे सांदेदुखी, हाडे ढिसूळ होणे, अ‍ॅसिडीटी इन्कामअ‍ेशन पोलचे विविध आजार ही पूर्वीच उग्र रुप धारण केले आहे. राज्यामध्ये निवडणूक आलीच की राजकीय मंडळी गावागावात भेटी सभा घेऊन विविध प्रकारचे आश्वासने देऊन सर्वत्र गावावाजा करतात. परंतु फ्लोराईडयुक्त पाण्याच्या समस्येबाबत गावकऱ्यांची अनास्था दिसून येते. रस्ते, नाल्या, सभामंडप, चावड्याचे जाळे पसविण्यात लोकप्रतिनिधी धन्यता माणून आम्ही ग्रामीण भागाचे विकास करीत आहोत. आमच्याकडून जो विकास झाला तो मुळीच कोणी करु शकत नाही असे जनतेला दर्शवून क्षेत्र लुटण्यातच धन्यता मानत असतात. क्षारयुक्त पाणी आणि गावकऱ्यांचे आरोग्य याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समस्त गावकऱ्यांचे बोलणे आहे. (वार्ताहर)