रासेयोतून नि:स्वार्थ सेवेची गरज
By Admin | Updated: September 29, 2014 23:08 IST2014-09-29T23:08:45+5:302014-09-29T23:08:45+5:30
माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रिद आहे. रासेयो आपल्याला लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. नि:स्वार्थ सेवेची गरज दाखवून देते, असे मत विधी

रासेयोतून नि:स्वार्थ सेवेची गरज
गोंदिया : माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रिद आहे. रासेयो आपल्याला लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. नि:स्वार्थ सेवेची गरज दाखवून देते, असे मत विधी विभागाच्या प्रा. अश्विनी दलाल यांनी व्यक्त केले.
नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात अध्यक्षीय मार्गदर्शनातून त्या बोलत होत्या. राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजना दिवस विविध कार्यक्रमांनी प्राचार्य योगेश नासरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रासेयोच्या २०० स्वयंसेवकांनी एक मुठ अन्न या उपक्रमाची सुरूवात केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अश्विनी दलाल, अतिथी म्हणून विधी विभागाचे प्रा. योगेश बैस, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन मेश्राम, विधी विभाग प्रमुख प्रा. सुयोग इंगळे उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकेतून रासेयो स्वयंसेवक योगेश खोब्रागडे यांनी उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी तांदूळ, दाळ, गव्हाच्या स्वरूपात घरून प्रत्येकी मुठभर धान्य एकत्रित करून रासेयोच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू लोकांना महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ आॅक्टोबरला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावून मदत करण्यात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान समाजसेवा करता येईल. परिसरातील लोकांना समजून घेता येईल. यानंतर विद्यार्थी व वक्त्यांची भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे संचालन पूजा उके यांनी तर आभार श्याम नागज्योती यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीणा उंदीरवाडे, छविंद्र मेश्राम, रमा ब्राह्मणकर, शुभम शिंगाडे, प्रतिक सोनवाने, सत्यम गलानी, वैभव शहारे, राखी पटले, दीपिका हलमारे, प्रवीण बांबोर्डे, ममिता पाचे, सुरेश बोपचे, मिनल पटले, यामिना सुलाखे, सावित्री रहांगडाले, चेतन दिहारी, शुद्धरेखा बोरकर, रक्षा रामटेके, नूतन खोब्रागडे, सुनीता कश्यप, हर्षा बिजेवार, पुष्पा लांजेवार, अर्चना नागरिकर, भरत माने, अक्षय विश्वकर्मा, रोहिणी नापुर्ते, प्रियंका सोनवाने यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)