नवयुवकांच्या नि:स्वार्थी कार्यापासून प्रेरणा घेण्याची गरज

By Admin | Updated: January 12, 2015 22:53 IST2015-01-12T22:53:27+5:302015-01-12T22:53:27+5:30

श्री अर्धनारेश्वरालय ट्रस्टच्या १५ नवयुवकांच्या नि:स्वार्थी कामापासून पे्ररणा घेऊन जनतेने कार्य करायला पाहिजे. नवयुवकांनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता जनतेसाठी नि:शुल्क सभागृह,

The need for inspiration from the selfless work of the youth | नवयुवकांच्या नि:स्वार्थी कार्यापासून प्रेरणा घेण्याची गरज

नवयुवकांच्या नि:स्वार्थी कार्यापासून प्रेरणा घेण्याची गरज

सालेकसा : श्री अर्धनारेश्वरालय ट्रस्टच्या १५ नवयुवकांच्या नि:स्वार्थी कामापासून पे्ररणा घेऊन जनतेने कार्य करायला पाहिजे. नवयुवकांनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता जनतेसाठी नि:शुल्क सभागृह, भांडी, डेकोरेशन उपलब्ध करुन समाजात उत्तम आदर्श निर्माण केला. अशा या कार्यापुढे मी नतमस्तक आहे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केले. ते श्री अर्धनारेश्वरालय शिवगण मंदिर परिसरात आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती राकेश शर्मा होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुरेश शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरलाल मडावी, आदिवासी सोसायटीचे संचालक उमेदलाल जैतवार, गणेश फरकुंडे उपस्थित होते. यावेळी अर्धनारेश्वर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांक डून शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आमदार पुराम यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय मार्गदर्शनात शर्मा यांनी नवयुवकांचे कौतुक करुन त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली, व सालेकसा तालुक्यात एक उत्तम सर्व सोयीने उपयुक्त पर्यटनस्थळ निर्माण केल्यामुळे तालुकावासियांसाठी ही गौरवाची बाब असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक करुन संचालन सचिव बाजीराव तरोणे यांनी केले. आभार ट्रस्टचे उपाध्यक्ष गोविंद वरखडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बिंदेश्वरी बावनथडे, ममता कापसे, द्वारका शेंडे, लक्ष्मी तरोने, हंसकला शेंडे, चेतन बिसेन, टेमेंद्र बिसेन, भरत साहू, दुर्गाप्रसाद साहू, पवन पटले, नवीन भेंडारकर, लोकेश कोरे, प्रदीप उईके, सुरेश कोटांगले, संतोष कापसे, रमेश फरकुंडे, रमेश कापसे, मुनेश्वर कापसे, राधेलाल धुर्वे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The need for inspiration from the selfless work of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.