किशोरवयीन मुला-मुलींना जागृत करणे काळाची गरज
By Admin | Updated: September 6, 2014 23:56 IST2014-09-06T23:56:05+5:302014-09-06T23:56:05+5:30
सामाजिक जागृती निर्माण करण्याकरिता आणि देह व्यापारास आळा घालण्याकरिता महिला व किशोरवयीन मुला-मुलींना जागृत करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प

किशोरवयीन मुला-मुलींना जागृत करणे काळाची गरज
देवरी : सामाजिक जागृती निर्माण करण्याकरिता आणि देह व्यापारास आळा घालण्याकरिता महिला व किशोरवयीन मुला-मुलींना जागृत करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गिरीष सरोदे यांनी केले.
ते देवरी प्रकल्पांतर्गत बोरगाव बाजार येथील शासकीय आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत ‘महिला व मुलींच्या जनजागृतीसाठी अनैतिक देहव्यापार प्रतिबंध’ व ‘कौटुंबीक हिंसारापासून महिलांचे संरक्षण’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
सदर कार्यशाळा गुरु मेहेर बहुउद्देशिय शिक्षण विकास संस्था पुलगाव जि.वर्धाच्या वतीने गुरुवारी (दि.४) पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून तज्ज्ञ मार्गदर्शक संजय पवार आणि गुरु मेहेर बहुउद्देशिय शिक्षण विकास संस्थेच्या अध्यक्ष तथा नागपूरच्या बाल कल्याण समितीच्या सदस्य अंजली गावंडे उपस्थित होत्या.
यावेळी पवार यांनी, महिला व मुलींच्या जनजागृतीसाठी अनैतिक देहव्यापार प्रतिबंध व कौटुंबिक हिंसारापासून महिलांना संरक्षण अधिनियम २००५ व २००६ यावर मार्गदर्शन केले. तर अंजली गावंडे यांनी, कायदेविषयक महिला वर्गात सर्वांना जनजागृती झाली पाहिजे. प्रतिबंध कायद्याचे ज्ञान त्यांना मिळाले पाहिजे. कौटुंबिक वातावरण संस्कारमय असले पाहिजे. अनैतिक बाबींकडे कुटुंबातील नवीन पिढीचे लक्ष जाणार नाही, याची काळजी समाजातील प्रत्येकाने घ्यावी, अशा शब्दात आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी सरोदे यांनी प्रकल्पांतर्गत कार्यान्वित संपूर्ण योजनांची माहिती दिली.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक मांडून उपस्थितांचे आभार आश्रम शाळेचे मुख्याध्यापक जे.एम. बारसागडे यांनी मानले. संचालन शिक्षक नेताजी गावळ यांनी केले. कार्यशाळेत आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.