कृषी विज्ञान केंद्राला सहकार्याची गरज
By Admin | Updated: September 5, 2015 02:19 IST2015-09-05T02:19:47+5:302015-09-05T02:19:47+5:30
दरवर्षी शेतकरी मोठया संख्येने कृषि विज्ञान केंद्र साकोलीला भेट देतात. त्याच्याच सहकार्याने शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी कृषी केंद्राला मदत होते.

कृषी विज्ञान केंद्राला सहकार्याची गरज
साकोली : दरवर्षी शेतकरी मोठया संख्येने कृषि विज्ञान केंद्र साकोलीला भेट देतात. त्याच्याच सहकार्याने शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी कृषी केंद्राला मदत होते. भविष्यात सुध्दा शेतकऱ्यांचा असाच प्रतिसाद मिळेल, असे प्रतिपादन अकोलाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्राच्या ११ व्या शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोलाचे विस्तार शिक्षण तज्ज्ञसंचालक डॉ. पी.जी. इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. चारी अप्पाजी, सिंदेवाही विभागीय संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. डी. व्ही. दुर्गे तसचे भंडारा जिल्हयातील विविध विभागाचे विभाग प्रमुखासह शेतकरी कैलाश गेडाम, अॅड. आशिष खेडीकर, नाबार्डचे अरविंद खापर्डे, साकोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. सांगळे, डॉ. उषा डोंगरवार, कृषि भुषण शेतकरी प्राणहंस मेहर, मिलिंद गुऱ्हेकर, प्रगतीशील शेतकरी या बैठकीचे सदस्य म्हणून उपस्थित होते.
डॉ. उषा डोंगरवार यांनी १० व्या शास्त्रीय सल्लागार समिती सभेच्या निर्णयावरील कार्यवाही सादर केली. त्यानंतर एप्रिल २०१३ ते मार्च २०१५ दरम्यान राबविण्यात आलेल्या व २०१५-१६ मधिल प्रास्ताविक कार्यक्रमाचे चलचित्राद्वारे प्रस्तुतीकरण केले. डॉ. चारी अप्पाजी यांनी कृषी विज्ञान केंद्र साकोलीचे अंतर्गत शेतकऱ्यांचे शेतावर प्रयोग, प्रथम रेशीम पिके प्रात्याक्षिके आणि सर्व कार्यक्रमामध्ये आत्माचा फार महत्वाचा वाटा आहे. शेतकऱ्यांना संदेश मिळावेत, याकरिता शेतकऱ्याचे मोबाईल नंबर किसान पोर्टलवर नोंदवावेत पीक संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा २००१ मध्ये शेतकऱ्यांनी त्यांचेकडे उपलब्ध वाणांची नोंदणी करावी. कृषी विज्ञान केंद्राने पिक संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा २००१ अंतर्गत दोन कार्यक्रम आयोजित करावे व कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे घेण्यात आलेले प्रशिक्षण व इतर कार्यक्रमाचा अवलंब प्रत्येक वर्षी करावे असे सांगितले.डॉ. इंगोले म्हणाले, फिरते माती परिक्षण प्रयोगशाळा चालविण्याकरिता निधी उपलब्ध नाही आणि या केंद्रावरील पदे रिक्त आहेत. यावर्षी माती परिक्षणाकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजना या प्रकल्पामधून सोय करण्यात आली आहे. संचालन व आभार प्रदर्शन डॉ. उषा डोंगरवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)