देवरी बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

By Admin | Updated: September 1, 2015 01:52 IST2015-09-01T01:52:07+5:302015-09-01T01:52:07+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदाकरीता घेण्यात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १५

NCP's flag at Deori Market Committee | देवरी बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

देवरी बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

देवरी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदाकरीता घेण्यात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १५ जागांवर विजय मिळविला तर भाजप-काँग्रेस युती असताना भाजपला ३ जागा मिळाल्या, तर व्यापारी/अडत्या मतदार संघातून अपक्ष अनिल प्यारेलाल अग्रवाल हे विजयी झाले. काँग्रेसचा एकही संचालक निवडून येऊ शकला नाही. व्यापारी/अडत्या गटातून राकाँ पॅनलचे युवा उमेदवार अंशुल प्रमोदकुमार अग्रवाल यांनी सर्वाधिक मते घेऊन विजय मिळविला. राष्ट्रवादीच्या संचालकांच्या विजयात सहकार नेते महेशकुमार जैन यांचा मोठा वाटा आहे.
सोमवारी सकाळी १० वाजतापासून आफताब मंगल कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. सर्वच उमेदवार व त्यांचे समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम सर्वाधिक चुरस असलेल्या व्यापारी/अडत्या मतदार गटाची मतमोजणी करण्यात आली. या गटातून ६३ उमेदवार रिंगणात होते.
ज्यामध्ये अंशुल प्रमोद अग्रवाल यांनी सर्वाधिक ८१, अनिल प्यारेलाल अग्रवाल यांनी ६५ मते घेऊन विजय मिळविला तर या गटातील नरेंद्र जैन यांना ५६, दीपक अग्रवाल ४९, प्रकाश बगडडिया १९, तर डॉ.अनिल चौरागडे यांना केवळ ३ मते मिळाली.
भाजपचे तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार यांनी सेवा सहकारी गटातून विजय मिळविला. तसेच भाजपचे ग्रा.पं. गटातील उमेदवार कमल येरणे व जितेंद्र रहांगडाले यांनी विजय मिळवीला. अन्य विजयी उमेदवारांमध्ये सेवा सहकारी सर्वसाधारण गटातून रमेश ताराम (११४ मते) विजय कश्यप (१०७), रीयाज खान (१००), तेसुराम रक्षा (९७), प्रमोद संगीडवार (९६) व अनिल वाल्दे यांनी ९५ मते घेऊन विजय मिळविला.
महिला राखीव मतदार संघातून दुर्गाबाई तिराले (१२०) व पुनीयाबाई मडावी यांनी १११ मते घेऊन विजय मिळविला.अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गातून श्रीराम मडावी यांनी ११२ तर इतर मागासवर्गीय राखीव प्रवर्गातून भास्कर धरमशहारे यांनी ११४ मते घेऊन विजय मिळविला.
ग्राम पंचायत सर्वसाधारण प्रवर्गातून जितेंद्र रहांगडाले यांनी २०३ व कमल येरणे यांनी २०१ मते तर ग्रा.पं. आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून द्वारका धरमगुडे यांनी २०७ व ग्रा.पं. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून हरीदास राऊत यांनी १८५ मते व विपणन प्रक्रिया मतदार संघातुन भैय्यालाल चांदेवार यांनी ७ मते प्राप्त करीत विजय मिळवीला. तर हमाल व तोलारी मतदारसंघातुन मारोती खंडारे हे अविरोध निवडून आले. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's flag at Deori Market Committee