महागाईविरोधात राष्ट्रवादीचे जनआक्रोश आंदोलन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:34+5:302021-07-07T04:35:34+5:30
देवरी : केंद्र शासनाच्या गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात देवरी तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी (दि.५) ...

महागाईविरोधात राष्ट्रवादीचे जनआक्रोश आंदोलन ()
देवरी : केंद्र शासनाच्या गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात देवरी तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी (दि.५) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
राणी दुर्गावती चौकातील पक्षाच्या कार्यालयासमोर पक्षप्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम व तालुकाध्यक्ष सी. के. बिसेन यांच्या मार्गदर्शनात केंद्र व मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करून निषेध नोंदविला. तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पारबता चांदेवार यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांनी नारेबाजी करीत गॅस व दुचाकींना फुलांचा हार चढवून प्रतीकात्मक गॅस सिलिंडरला तिलांजली वाहिली. दिवसेंदिवस गॅस व इंधनाची दरवाढ होत असून पेट्रोल-डिझेल दराने उच्चांक गाठला आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गॅस, इंधन दरवाढ व महागाई वारंवार भडका घेत असल्याने केंद्र शासनाच्या विरोधात निषेध नोंदवून संताप व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारने संतापाचा अंत पाहण्यापेक्षा तात्काळ गॅस, पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ कमी करावी, या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी शहर अध्यक्ष मुकेश खरोले, जिल्हा उपाध्यक्ष गोपाल तिवारी, वरिष्ठ नेते भय्यालाल चांदेवार, मुन्ना हंसारी, सुजित अग्रवाल, बबलू पठाण, योगेश देशमुख, मनोहर राऊत, सारंग देशपांडे, इंदल अरकरा, युगेश बिसेन, मोसीन हंसारी, चरण चव्हाण, रंजन मेश्राम, पंकज शहारे, अरविंद शेंडे, नरेश कुंभरे, प्रकाश जनबंधू, ताजमोहम्मद कुरेशी, नवशाद पठाण, देवेंद्र घोटे, दिनेश गोडसेलवार, कैलास टेंभरे, महेंद्र निकोडे, दीपक चुटे, विकास मुंडे, सुरजीत कोराम, प्रीतम गजभिये, यशवंत शिवनकर, महिला शहर अध्यक्ष शर्मीला टेंभुर्णीकर, सुमन बीसेन, अर्चना ताराम, मंजूषा वासनिक, आरती जांगळे, अनुकला कोडापे, कोमल खरोले उपस्थित होते.