नक्षल जिल्ह्याला सुसज्ज रेल्वेसेवेची गरज- पटेल

By Admin | Updated: September 22, 2015 03:07 IST2015-09-22T03:07:49+5:302015-09-22T03:07:49+5:30

आॅक्टोबर महिन्यात दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत केंद्रीय मंत्री व खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक

Naxal district needs a well equipped railway service- Patel | नक्षल जिल्ह्याला सुसज्ज रेल्वेसेवेची गरज- पटेल

नक्षल जिल्ह्याला सुसज्ज रेल्वेसेवेची गरज- पटेल

गोंदिया : आॅक्टोबर महिन्यात दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत केंद्रीय मंत्री व खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक महाव्यवस्थापक सत्येंद्रकुमार यांच्या संयोजनात नागपूर येथे होणार आहे. याबाबत खा.प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्ह्याला सुसज्जित रेल्वे सेवेची गरज असून त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
खा.पटेल यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार, आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित गोंदिया जिल्ह्याला महसूल व रेल्वेगाड्यांची भरपूर सुविधांनी सुसज्जित करण्यासाठी गाडी (१२२२२/१२२२२) पुणे-हावडा दुरंतो गाडी (१२२६१/१२२६२) मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेस व गाडी (२२८६५/२२८६६) एलटीटीई-पुरी या सुपरफास्ट गाड्यांना थांबा देवून तसेच महाराष्ट्र एक्सप्रेसप्रमाणेच गोंदिया-मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेसमध्ये गोंदिया-नागपूर-गोंदिया दरम्यान काही स्लीपर बोगींमध्ये अनारक्षित प्रवाशांना प्रवास करण्याची सुविधा देणे गरजेचे आहे. अशाचप्रकारे त्यांनी देशातील सर्व १६ झोनमध्ये जेडआरयूसीसी यासारखी महत्त्वपूर्ण कमिटी २० जून २०१४ पासून भंग करण्यात आल्याने आपली नापसंती व्यक्त केली आहे.
या कमिटीमध्ये संबंधित क्षेत्रातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश राहात होता. ते सामान्य रेल्वे प्रवाशांच्या हिताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होते. त्यामुळे या कमिटीला पुन्हा गठित करून जनतेची भागीदारी वाढवून रेल्वे समस्यांच्या संदर्भात सार्थक परिणाम मिळविण्यात यावे, असे आवाहन खा.पटेल यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Naxal district needs a well equipped railway service- Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.