नवेझरीच्या प्रवासी निवाऱ्याचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:54 IST2017-11-22T23:54:04+5:302017-11-22T23:54:15+5:30

तिरोडा-करडी-भंडारा मार्गावर असलेल्या नवेझरी येथील बस स्थानकावरील प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले.

Navigator's passenger shelter collapsed | नवेझरीच्या प्रवासी निवाऱ्याचे छत कोसळले

नवेझरीच्या प्रवासी निवाऱ्याचे छत कोसळले

ठळक मुद्देनिकृष्ट बांधकाम : ग्राम मंडळाच्या पत्राला केराची टोपली

ऑनलाईन लोकमत 
परसवाडा : तिरोडा-करडी-भंडारा मार्गावर असलेल्या नवेझरी येथील बस स्थानकावरील प्रवासी निवाºयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. परिणामी प्रवासी निवाºयाचे छत कोसळले. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.
नवेझरी येथे बस स्थानकावर प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे. याचे कंत्राट देण्यात आले होते. या प्रवासी निवाºयाच्या बांधकामाचे देयक अद्यापही निघालेले नाही. मात्र त्यापूर्वीच या प्रवासी निवाºयाचे छत कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या ठिकाणी दररोज प्रवासी व विद्यार्थी बसतात. प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे तो केव्हाही कोसळून मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी महेंद्र भांडारकर व ग्राम मंडळातर्फे पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र या विभागाच्या अधिकाºयांनी अद्यापही त्याची दखल घेतली नाही. येथील धोकादायक प्रवासी निवारा पाडून नवीन प्रवाशी निवाºयाचे परत बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

Web Title: Navigator's passenger shelter collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.