नवेगावबांधला मिळणार गतवैभव

By Admin | Updated: February 25, 2017 00:17 IST2017-02-25T00:17:08+5:302017-02-25T00:17:08+5:30

निसर्गाने नवेगावबांधला भरभरु न दिले आहे. परंतू आजपर्यंत तलाव परिसरात असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर झालेला नाही.

Navegaonbandh gets the chance | नवेगावबांधला मिळणार गतवैभव

नवेगावबांधला मिळणार गतवैभव

पालकमंत्र्यांची ग्वाही : बहुप्रतीक्षित बोटिंगचा शुभारंभ
गोंदिया : निसर्गाने नवेगावबांधला भरभरु न दिले आहे. परंतू आजपर्यंत तलाव परिसरात असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर झालेला नाही. या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक येतील आणि त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करु न देण्यासाठी नवेगावबांध तलाव परिसराला गतवैभव प्राप्त करु न देणार, अशी ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
शुक्रवारी (दि.२४) नवेगावबांध जलाशयात अनेक दिवसांपासून बोटींग सुरू करण्याची मागणी पर्यटकांकडून होत होती. त्याचा शुभारंभ पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आला. नवेगावबांध संयुक्त वनव्यवस्थापन समिती ही बोटींगची व्यवस्था सांभाळणार आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्र मात पालकमंत्री बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, माजी आमदार तथा नवेगावबांध संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयाराम कापगते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी व्ही.जी.उदापुरे, गोंदिया पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे, माजी सरपंच रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, अण्णा-पाटील डोंगरवार, रामदास बोरकर, विजय डोये, घनश्याम चांदेवार यांची उपस्थिती होती. पालकमंत्री पुढे म्हणाले, नवेगावबांधला येणाऱ्या पर्यटकांची संख्या भरपूर आहे. परंतू येथे सुविधा नसल्यामुळे त्यांचा हिरमोड होतो. आता बोटींगचा सुविधा सुरु झाली आहे. कार्यक्र माला वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पर्यटक उपस्थित होते. प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी खान यांनी केले. उपस्थितांचे आभार सहायक वनरक्षक शेंडे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)

अशा आहेत बोटी
बोटींगची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चार व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या २ रोवींग बोट, दोन व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या २ पॅडल बोट आणि २ कॅग बोट उपलब्ध झाल्या आहे. २० बेरोजगार युवकांनी याचे प्रशिक्षण घेतले असून ३ जणांनी लाईफ गार्डचे प्रशिक्षण घेतले आहे. बोटींगची फी २० मिनिटांसाठी ३० रु पये आकारण्यात येणार आहे.

रोप वे, वॉटर पार्कही होणार
भविष्यात इथे बिचेस, रोप वे, वॉटर पार्क तयार करु न याचे सौंदर्य अधिक खुलवले जाईल. येत्या दोन वर्षात नवेगावबांधचा कायापालट होईल. पर्यटकांच्या दृष्टीने इथे रिसॉर्टची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. बोटींग करताना कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यटकांचा ओढा वाढल्यानंतर बोटींगची संख्याही वाढविण्यात येईल असेही ना.बडोले म्हणाले.
डॉ.रामगावकर म्हणाले, भविष्यासाठी इथे अनेक योजना राबवायच्या आहेत. पर्यटकांना चांगल्या सुविधा करु न देण्यासाठी वन विभाग पुढाकार घेईल. पर्यटन वाढल्यास बेरोजगारांच्या हाताला काम सुध्दा उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या पर्यटकांना वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची आवड या भेटीतून निर्माण होईल, असे ते म्हणाले.
माजी आमदार कापगते म्हणाले, नवेगावबांध येथे राष्ट्रीय पक्षी अभयारण्य आहे. त्याचा विकास झाला पाहिजे. अभयारण्यात चांगल्या रस्त्यांची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. पर्यटकाला या परिसरात आल्यानंतर संपूर्ण दिवसभर फिरण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Navegaonbandh gets the chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.