निसर्गाचा कोप, धानपीक संकटात

By Admin | Updated: October 18, 2014 01:40 IST2014-10-18T01:40:20+5:302014-10-18T01:40:20+5:30

यावर्षी पावसाने उशीरा हजेरी लावली व वेळेपूर्वीच पाऊस गेल्याने यावर्षी जड धानावर संकांत येण्याची शक्यता आहे.

Nature's corners, rain pitfalls | निसर्गाचा कोप, धानपीक संकटात

निसर्गाचा कोप, धानपीक संकटात

परसवाडा : यावर्षी पावसाने उशीरा हजेरी लावली व वेळेपूर्वीच पाऊस गेल्याने यावर्षी जड धानावर संकांत येण्याची शक्यता आहे. हलक्या धानाचे उत्पादन समाधानकारक आहे. मात्र जड धानाच्या उत्पन्नात कमालीची घट होणार आहे. निसर्गाच्या कोपाने हलक्या धानाचे उत्पन्न घरी येईल की नाही, अशी परिस्थिती आहे. पावसाने वेळेपूर्वीच दडी मारल्याने धानपीके संकटात आली आहे.
जुलै व आॅगस्ट महिन्यात पाऊस समाधानकारक आला. दोनवेळा पूर परिस्थीती निर्माण झाली. सुरूवातीला एक महिना पाऊस न आल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यांनतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी केली. त्यांनतर पावसाचा जोर वाढला. पूराने अनेक रोवणी वाहून गेली. परंतु अॉगस्ट महिन्यापासूनच पावसाने दडी मारल्यामुळे पीके पुन्हा संकटात आली. पावसाच्या या लपंडावामुळे शेतकऱ्यांनी हलक्या धानाची लागवड केली. त्या ठिकाणी उत्पादनात समाधानकारक दिसून येत होते मात्र पावसने मधातच दडी मारल्याने हलक्या धानाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिट सुरू होता. मात्र भारी धानाला लागणारे पाणी आणावे कुठून अशी समस्या शेतकऱ्यांपुढे होती. ज्या ठिकाणी कालव्याद्वारे सिंचनाची सोय होती त्या ठिकाणी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडविण्यात आले. यावर्षी हलक्या धानाच्या उत्पन्न कमी प्रमाणात आहे. हलक्या धान्याची १०१० आणि १००१ या प्रजातीच्या धानात अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आतापर्यंत हलक्या जातीच्या धानावर रोगाचा आणि किडींचा प्रादुर्भाव जाणवत होतो. परंतु यावर्षी निसर्गाच्या लपंडावामुळे शेतकरीबांधव चांगलेच त्रस्त झाले आहेत. मात्र ही वेळ निसर्गाची त्रास देण्याची नाही, हा एक प्रकोप म्हणावा लागेल. कधी सतत पाऊस येतो तर कधी पाऊस दडी मारतो. सद्यस्थितीत हलक्या धानाला एका पाण्याची गरज होती ती पूर्ण झाली नाही. परंतु सतत येणाऱ्या पावसाने दडी मारल्यामुळे हलक्या धानाला नुकसान झाला आहे. हलक्या धानाचे सध्यातरी उत्पादन पाहून शेतकरी समाधानी असले तरी भीतीचे वातावरण कायम आहे.
भारी धानाच्या जातीचे पीक मात्र शेतकऱ्यांना रडवणार आहे. भारी धान्याची लागवड शेतकरी उशिरा करतो. त्यामुळे पीक कोवळे असते. याला कडा, करपा, खोडकिडा, गादमाशी, मावा तुटतुडा यासारखे रोग व किडीने धान्य पिकांची नासाडी केली आहे. शेतकऱ्यांची ईच्छा नसताना भरपूर खत व औषधींचा वापर केला तरी भारी धान्यात सुधारणा दिसून येत नाही. भारी धानाच्या पिकास प्रारंभीपासून रोग व किडीने ग्रासले आहे. आताही विविध प्रकारच्या रोगाने ग्रासले आहे. निश्चितच भारी धानाच्या उत्पन्नात ५० टक्केच्या वर घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मावा, तुडतुडा यांचा प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे.

Web Title: Nature's corners, rain pitfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.