शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:48 PM

जुन्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या सेवा खंडीत हजेरी सहायकांची संख्या राज्यात ४२ आहे. फक्त गोंदिया जिल्ह्यात २५ हजेरी सहायक आहेत. त्यात आमगाव तालुक्यात नऊ, सालेकसा तालुका नऊ, देवरी तालुका एक, गोंदिया तालुका एक व सडक-अर्जुनी तालुक्यात १० अशा २५ जणांना १९ डिसेंबर २०१८ रोजी त्यांच्या पंचायत समितीत रूजू करण्यात आले.

ठळक मुद्दे१२ दिवसांपासून उपोषण सुरूच : १४ महिन्यांपासून वेतनाविना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुन्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या सेवा खंडीत हजेरी सहायकांना (सध्या कार्यरत मेट) १९ डिसेंबर २०१८ पासून पंचायत समित्यांमध्ये रूजू करण्यात आले. परंतु १४ महिन्यांचा कालावधी लोटूनही त्यांना आतापर्यंत वेतन देण्यात आले नाही. वेतन देण्यात यावे या मागणीला घेऊन जिल्ह्यातील सर्वच मेट बेमुदत उपोषणावर बसले आहेत. यातील चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.जुन्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या सेवा खंडीत हजेरी सहायकांची संख्या राज्यात ४२ आहे. फक्त गोंदिया जिल्ह्यात २५ हजेरी सहायक आहेत. त्यात आमगाव तालुक्यात नऊ, सालेकसा तालुका नऊ, देवरी तालुका एक, गोंदिया तालुका एक व सडक-अर्जुनी तालुक्यात १० अशा २५ जणांना १९ डिसेंबर २०१८ रोजी त्यांच्या पंचायत समितीत रूजू करण्यात आले. परंतु रूजू झाल्यापासून आतापर्यंत त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. प्रशासकीय निधीतून ६ टक्के रक्कम देण्याचे शासनाने १ मार्च २०१९ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत ठरविले होते. परंतु त्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यात आली नाही.परिणामी या हजेरी सहायकांवर उपासमारीची पाळी आली आहे. यामुळे सर्व हजेरी सहायकांनी जिल्हा परिषद इमारत समोरील पतंगा मैदानात १० फेब्रुवारीपासून उपोषणाला सुरूवात केली आहे. उपोषणाला १२ दिवस लोटले तरीही त्यांची समस्या सुटली नाही.अशात मात्र थानसिंग रहांगडाले, शामराव भांडारकर, लक्ष्मण बारसे व रवी चंद्रिकापुरे या चौघांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपाचारसाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तर उपोषणावर आत्माराम भेलावे, देवराम मेंढे, मुनेश्वर कांबळे, रवी सोनटक्के, अशोक दहिवले, दिगंबर कोरे, श्यामकैलास देसाई, घनश्या म फुंडे, राजेंद्र मेश्राम, लिलाधर बहेकार, तेजराम कोरे, भानूदास डोये, विनोद लांजेवार, अनिल कोरे, पारासर कठाणे, भागवत सोनवाने, रामचंद्र बडोले व ईतर बसले आहेत.