चांगल्या व्यक्तींसाठी निसर्गही रडतो

By Admin | Updated: May 5, 2016 01:54 IST2016-05-05T01:54:49+5:302016-05-05T01:54:49+5:30

चेहऱ्यावर सदैव हास्य, मिळून कार्य करण्याची शैली, सहकार्य आणि सामंजस्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी सर्वांचीच मने जिंकून घेतली.

Nature also cry for good people | चांगल्या व्यक्तींसाठी निसर्गही रडतो

चांगल्या व्यक्तींसाठी निसर्गही रडतो

उषा मेंढे यांचे प्रतिपादन : दिलीप गावडे यांचा निरोप समारंभ
गोंदिया : चेहऱ्यावर सदैव हास्य, मिळून कार्य करण्याची शैली, सहकार्य आणि सामंजस्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी सर्वांचीच मने जिंकून घेतली. त्यांच्या नियोजनबध्द कार्यामुळेच जिल्हा परिषदेतून शासनाचा एकही पैसा परत गेला नाही. चांगली माणसे आपल्यामागे छाप सोडून जातात. अशा व्यक्तींसाठी निसर्गही रडत आहे, अशा भावना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे यांनी व्यक्त केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांचे अहमदनगर महानगरपालिकेत आयुक्त पदावर पदोन्नतीने स्थानांतरण झाले. त्यानिमित्त आयोजित समारंभात आपल्या भावना व्यक्त करताना अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
स्व.वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात सोमवारी दुपारी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यातर्फे कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिचे सभापती पी.जी. कटरे, महिला व बालकल्याण समितीचे सभापती विमल नागपुरे, कृषी व पशूसवंर्धन समितीचे सभापती छाया दसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल. पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आर.ए. देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीष कळमकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रा.मा. चव्हाण, कार्यकारी अभियंता (बांधकाम) खांडरे, कार्यकारी अभियंता (लपा) पथाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) अंबादे, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी चव्हाण, समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो) भांडारकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत, शिक्षणाधिकारी (प्राथ.) नरड, शिक्षणाधिकारी (माध्य) फटे व सर्व गट विकास अधिकारी या वेळी उपस्थित होते.
याप्रसंगी महिला व बालकल्याण समितीचे सभापती विमल नागपुरे, कृषी व पशूसवंर्धन समितीचे सभापती छाया दसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल. पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आर.ए. देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रा.मा. चव्हाण, गट विकास अधिकारी एन.आर. जमईवार यांनी मनोगत व्यक्त करून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांच्या विविध गुणांचा उल्लेख करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्याकडून तथा जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्यातर्फे दिलीप गावडे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. शर्मा यांनी गीत सादर करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी (सांख्यिकी) वैशाली खोब्रागडे यांनी केले. आभार वरिष्ठ लेखा अधिकारी विजय जवंजाळ यांनी मानले. कार्यक्रमात जिल्हा परिषदचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (प्रतिनिधी)

सकारात्मक विचारातूनच मिळते प्रोत्साहन
एखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असेल तर ती व्यक्ती प्रोत्साहन देण्याचे कार्य करतो. कोणतेही कार्य करायचे तर धडाडीने करायचे, अशा अनेक गुणांचा उल्लेख करु न शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती पी.जी. कटरे यांनी दिलीप गावडे यांना शुभेच्छा दिल्या.
गोंदियातून जातांना सर्वांकडूनच आपण काहीना काही शिकून जात असल्याचे मत निरोप समारंभाला मार्गदर्शन करताना दिलीप गावडे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्याकडून संयम, कटरे यांच्याकडून सक्षमता, विमल नागपुरे यांच्याकडून आवेश, वेगवेगळ्या शक्तींना एकत्र आणण्याचा गुण छाया दसरे यांच्याकडून, पुराम यांच्याकडून कणखरता, जिल्हा शल्यचिकित्सकांकडून समज, कॅफोकडून परिश्रमाचे गुण घेवून जात असल्याचेही ते याप्रसंगी म्हणाले. सर्व विभागप्रमुखांच्या विविध गुणांचादेखील त्यांनी या वेळी उल्लेख केला. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अशाचप्रकारे कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Nature also cry for good people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.