उपजिल्हा रुग्णालय तिरोडाला राष्ट्रीय नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:23+5:30
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्लीमार्फत राज्यात लक्ष्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण रोखणे, शासकीय आरोग्य संस्थामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदार मातांना सर्व सोयी सुविधा देणे, त्यांची प्रसूती सुरक्षितपणे व्हावी, याविषयी प्रसूतीगृह व शस्त्रक्रियागृहातील सुधारणांची पाहणी ऑगस्टमध्ये राष्ट्रीय स्तरावरील दोन सदस्यीय पथकाने पाहणी केली होती.

उपजिल्हा रुग्णालय तिरोडाला राष्ट्रीय नामांकन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र शासनाच्या लक्ष्य कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथील प्रसूतीगृह व शल्यक्रियागृहाची पाहणी २० व २१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पथकामार्फत करण्यात आली. सन २०१८-१९ मध्ये ४७७ बाळंतपण सुखरुप करण्यात आले. २२९ जोखमेच्या मातांवर सिजेरीयन (शस्त्रक्रिया ) करुन त्यांची प्रसूती सुरळीतपणे करण्यात आली. मोफत व दर्जेदार सेवांमुळे माता मृत्यूचे प्रमाण शून्य आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्लीमार्फत राज्यात लक्ष्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण रोखणे, शासकीय आरोग्य संस्थामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदार मातांना सर्व सोयी सुविधा देणे, त्यांची प्रसूती सुरक्षितपणे व्हावी, याविषयी प्रसूतीगृह व शस्त्रक्रियागृहातील सुधारणांची पाहणी ऑगस्टमध्ये राष्ट्रीय स्तरावरील दोन सदस्यीय पथकाने पाहणी केली होती. त्यामध्ये शिमला, हिमाचल प्रदेश येथून डॉ. सोनल नेगी,उत्तरप्रदेश येथून डॉ.फैजल रहमान यांची नियुक्ती केंद्र शासनातर्फे करण्यात आली होती. उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे योग्य ती उपाययोजना व सुधारणा केल्याने व माता मृत्यू दर शून्यावर आणल्याने येथील प्रसूतीगृहास ९१ टक्के व शस्त्रक्रियागृहाच्या ८३ टक्के गुणांकन प्राप्त झाल्याने या रुग्णालयास राष्ट्रीय नामांकन प्राप्त झाल्याचे केंद्र शासनाकडून २६ सप्टेंबर २०१९ च्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम व त्यांच्या चमूद्वारे या रुग्णालयाचा कायापालट करण्यात आला. राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार या रुग्णालयाला मिळाला आहे. तसेच डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार सलग सहा वर्षापासून मिळत आहे. या रुग्णालयात मॉप्युलर शस्त्रक्रिया व सर्व सोयीसुविधा युक्त प्रसूतीगृह आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ व बधिरीकरण तज्ज्ञ यांच्या उपलब्धतेमुळे सन २०१८-१९ मध्ये ४७७ महिलांची सुखरुप प्रसूती करण्यात आली. यातील २२९ जोखमेच्या मातांवर सिजेरीयन शस्त्रक्रिया करुन त्यांची प्रसूती सुरळीतपणे करण्यात आली.मोफत व दर्जेदार सेवांमुळे माता मृत्यूचे प्रमाण शून्य आहे.
आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. भूषणकुमार रामटेके,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज राऊत, डॉ.मिना वट्टी, डॉ. स्वर्णरेखा उपाध्याय यांचे सहकार्य लाभले. उपजिल्हा रुग्णालय तिरोडाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय स्तरावरील नामांकनाचे यश प्राप्त झाले. परिणामी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी सर्वांचे आभार मानले.