राष्ट्रीय जंतनाशक दिनाची जोरात सुरूवात
By Admin | Updated: September 12, 2016 00:29 IST2016-09-12T00:29:39+5:302016-09-12T00:29:39+5:30
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे महाविद्यालयाचे प्राचार्य टी.टी. रहांगडाले

राष्ट्रीय जंतनाशक दिनाची जोरात सुरूवात
वडेगाव : राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे महाविद्यालयाचे प्राचार्य टी.टी. रहांगडाले यांनी सर्व विद्यार्थ्यानी सभा घेवून त्यांना शरीरात जंतापासून होणारे अपाय व जंत कशामुळे शरीरात निर्माण होतात आणि जंतनाशक गोळीपासून होणारे फायदे यावर सविस्तर माहिती दिली.
यानंतर लगेच जंतनाशक गोळी वाटप समिती यांचेतर्फे वर्ग पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गोळ्या सेवन करायास सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी वितरित करण्यासाठी समिती तयार करण्यात आली. समितीमध्ये एच.बी. नागदेवे, वाय.के. नागपुरे, पी.एस. मेश्राम, आर.जी. पुस्तोडे, एस.के. कांद्ये, आर.टी. वानखेडे, बैंगने, पारधी, वरठी, मेश्राम इत्यादीचा समावेश होता.
सदर समिती सदस्यांना अलोने, झंझाळ, शेंडे, अन्सारी, गैरवार, रहांगडाले, पटले, बिसेन, चावके, कावळे, पडोळे, डोंगरे, समरीत यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी जंत कशामुळे होतात, ते आरोग्यासाठी कसे अपायकारक असतात व त्यावर उपाययोजना काय, यावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी होवून कोणत्याही विद्यार्थ्याला जंतनाशक गोळीचा त्रास झाला नाही. (वार्ताहर)