सरस्वती विद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST2021-09-15T04:34:23+5:302021-09-15T04:34:23+5:30
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान सभेने १४ सप्टेंबर १९४९ ला हिंदी भाषेला देशाची राजभाषा जाहीर केले. हिंदी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ...

सरस्वती विद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान सभेने १४ सप्टेंबर १९४९ ला हिंदी भाषेला देशाची राजभाषा जाहीर केले. हिंदी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण व्हावी, तसेच हिंदी भाषेतील साहित्यकारांना चांगला दर्जा मिळावा या उद्देशाने सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा प्राचार्य अनिल मंत्री होते. यावेळी प्रामुख्याने जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी, शाळेच्या पर्यवेक्षिका छाया घाटे, संजय बंगळे उपस्थित होते. याप्रसंगी ‘ए मेरे वतन’ व ‘भारतीय वीरांगणा’ या दोन विषयांवर शुभेच्छा कार्ड बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी कौशल्याने उत्कृष्ट अशा बनवलेल्या शुभेच्छा कार्ड प्रदर्शनीचे उद्घाटन प्राचार्य अनिल मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदी दिनाविषयी माहिती शिक्षक महेश पालीवाल यांनी विशद केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदी शिक्षका माधुरी पिलारे, होमराज गजबे, भाग्यश्री सिडाम, चेतना गोस्वामी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन ज्येष्ठ हिंदी शिक्षक महेश पालीवाल यांनी केले.