राष्ट्रीय महामार्ग ठरतोय मृत्यूमार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST2020-03-05T05:00:00+5:302020-03-05T05:00:16+5:30
गाजावाजा करून रामटेक-तुमसर- गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. परंतु सध्या रस्त्याचे बांधकाम अतिशय हळूवार सुरु आहे. रस्त्यावर वापरण्यात आलेले मुरुम, रेती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर साहित्य मिळत नसल्याने रस्त्याची कामे संथगतीने सुरु असल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी सध्या चौकशी सुरु असल्याचे समजते.

राष्ट्रीय महामार्ग ठरतोय मृत्यूमार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रामटेक-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. देव्हाडी शिवारातून जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम संथगतीने सुरु असून मुरुम घातलेल्या रस्त्यावर पाणी शिंपडले जात नाही. त्यामुळे सर्वत्र धुळच धुळ हवेत तरंगत आहे. समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताची मालीका येथे सुरु आहे. रस्त्यावरील मुरुमही येथे समतल न केल्याने दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
गाजावाजा करून रामटेक-तुमसर- गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. परंतु सध्या रस्त्याचे बांधकाम अतिशय हळूवार सुरु आहे. रस्त्यावर वापरण्यात आलेले मुरुम, रेती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर साहित्य मिळत नसल्याने रस्त्याची कामे संथगतीने सुरु असल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी सध्या चौकशी सुरु असल्याचे समजते.
देव्हाडी-माडगी शिवारातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूमार्ग ठरला आहे. पुलाचे वळणमार्ग धोकादायक असून रस्त्यावरील मुरुमाची धुळ प्रचंड उडत आहे. पाणी शिंपडण्याची गरज असताना यंत्रणा येथे गाफील आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, सार्वजनिक मंत्र्याना तक्रार केली आहे.
-निशिकांत पेठे, प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस.
देव्हाडी माडगी शिवारातील एक किमीचा रस्ता बांधकाम सुरु असून पाण्याची समस्या असल्याने पाणी शिंपडले जात नाही. उर्वरीत समस्या लवकर निकाली काढण्यात येईल. पाणी उपलब्ध व्हावे याकरिता संबंधित विभागाशी संपर्क करणार आहे.
-संजीव जगताप, उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण.
अपघातांची मालिका सुरूच
सध्या रस्त्यावर मुरुम घालण्यात आले आहे. नियमानुसार त्यावर पाणी शिंपडणे अनिवार्य आहे. परंतु येथे पाणी घातले जात नाही. परिणामी परिसरात सर्वच धुलीकण मोठ्या वातावरणात पसरत आहेत. सदर रस्ता अतिशय वर्दळीचा असून धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताची मालिका येथे सुरु आहे.
मुरुमाचे ढीग
रस्त्यावर घालण्याकरिता मुरुम आणून ठेवण् यात आले आहे. मुरुम हा पसरविल्याने ढिगावर आवळून अपघाताची शक्यता वाढली आहे. नवनिर्मित रस्त्यावर खड्डे पडले आहे. रात्री हे खड्डे वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे वाहन अनियंत्रीत होऊन अपघात वाढले आहे.