रातुमच्या अभ्यास मंडळावर नासरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:33 IST2018-09-10T21:33:00+5:302018-09-10T21:33:18+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वस्त्रशास्त्र विषयाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षपदी येथील एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ.माधुरी नासरे यांची निवड करण्यात आली.

Nasare on RTM | रातुमच्या अभ्यास मंडळावर नासरे

रातुमच्या अभ्यास मंडळावर नासरे

गोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वस्त्रशास्त्र विषयाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षपदी येथील एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ.माधुरी नासरे यांची निवड करण्यात आली. झालेल्या निवडणुकीत त्यांनी सर्वाधीक मते घेऊन अध्यक्षपदाची माळ त्यांनी आपल्या गळ्यात घातली. नासरे ह्या यापूर्वी रातुम नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या गृहविज्ञान शाखेच्या अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी सदर निवडणूक गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखील जैन यांच्या मार्गदर्शनात लढविली. त्यांचे कौतुक प्राचार्य डॉ.एन.के.बहेकार, डॉ. रजनी चतुर्वेदी, डॉ. अंजन नायडू, बी. आर. शर्मा, डॉ. मृत्यूंजयसिंग, आलोक द्विवेदी यांनी केले.

Web Title: Nasare on RTM