राष्ट्रसंताचे नाव थोर पुरुषांच्या यादीत द्या
By Admin | Updated: September 22, 2014 23:22 IST2014-09-22T23:22:54+5:302014-09-22T23:22:54+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव भारताला स्वातंत्र मिळवून देणाऱ्या राष्ट्रपुरूषांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या सदस्यांनी केली आहे.

राष्ट्रसंताचे नाव थोर पुरुषांच्या यादीत द्या
गोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव भारताला स्वातंत्र मिळवून देणाऱ्या राष्ट्रपुरूषांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या सदस्यांनी केली आहे. शासनाच्या नावे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
क्रांतीनायक, मानवतेचे महापुजारी, सहस्त्र पैलू व्यकितमत्वाचे धनी, क्रांतीदर्शी स्वातंत्र्य चळवळीत सिंहाचा वाटा असणारे, विश्वसंत वंदनिय तुकडोजी महाराज हे दिव्य पुरुष होते. भारत मातेच्या रक्षणार्थ १०० दिवस नागपूर व रायपूरच्या तुरुगांत राहीले. ते स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. १९५३ मध्ये जनपानमध्ये विश्वस्तरीय साधू समाज परिषद भरली असताना भारत मातेचे गौरव गीत गावून श्रीराम व श्रीकृष्णाचे देश विश्वाला शोभून राहणारे देश असून ‘प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, विरों का मैदान, इसमें भक्तो के भगवान है’, अशी गर्जना करुन आपला परिचय करुन दिला. त्यावेळी ते १८ राष्ट्राचे अध्यक्ष होते. ही भारत वंशियांसाठी अभिमानाची बाब आहे.
अशा सर्वव्यापी, दिव्यपुरुषाचे नाव महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांनी थोर पुरुषांच्या यादीत तुकडोजी महाराजांचे नाव समाविष्ठ करण्यात यावे, याकरिता वर्ष २०१४ मध्ये संपुर्ण महाराष्ट्रात राष्ट्रसंताचे चरण पादुकांची पालखी फिरवून श्री गुरुदेव क्रांती ज्योत यात्रा काढण्यात आली. लाखों भाविकांच्या निदर्शनात ही बाब आणून दिली.
मानवतेचे शिखर गाठणारे, ग्रामगीतेचे जनक, विश्वात्मक दृष्टीकोन राखणारे, तेजोमय संताचे तत्वज्ञान विश्वमान्य असे असून ही शासनाचे दुर्लक्ष व्हावे, ही शोकांतिका आहे.
राष्ट्रसंताचे नाव थोर पुरुषांच्या यादीत त्वरीत यावे, याकरिता केंद्रीय प्रचार प्रमुख बबनराव बानखेडे, केंद्रीय प्रचार विभाग सचिव दामोदर पाटील, विभागीय प्रसारक भानुदास कराळ, डॉ. राजाराम बोथे, ह.भ.प. गुलाबराय खवसे महाराज, अ.भा. श्री गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रम जि. अमरावती यांचे पथक राज्यभर फिरले.
गोंदिया जिल्ह्यामध्ये क्रांती ज्योत यात्रेकरिता आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्याकरिता आचार्य एम.ए. ठाकूर यांनी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने जिल्हा प्रचार प्रमुख भोजराज बघेले, तालुका प्रचार प्रमुख गेंदलाल बघेले, सेवाधिकारी गोरेगावचे ह.भ.प. प्रेमलाल घरत, प्रा. एल.आर. राणे, जिल्हा संघटक देवराव कटरे, शामलाल कटरे, दिनदयाल बघेले, चव्हाण, शामलाल कारंजेकर, शाम मारबदे, अदासी येथील भुमेश्वर ब्राम्हणकर, भोजलाल बिसेन, योगराज येळे, पटले, संतोष चौधरी,व्ही.झेड. बावणकर, परसराम पटले, साजी बोरकर, हिरालाल बिसेन, अशोक हरिणखेडे, दुधराम भांडारकर, प्रकाश रहांगडाले, मेंढे, वाढई, चन्ने, भरत चचाने व जिल्ह्यातील गुरुदेव भाविक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)