कावराबांध आरोग्य केंद्राचे आयएसओसाठी नामांकन

By Admin | Updated: May 25, 2015 01:14 IST2015-05-25T01:14:06+5:302015-05-25T01:14:06+5:30

उत्तम आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून जिल्हा व विभागच काय तर राज्यात ओळख असलेल्या कावराबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यशाची वाटचाल सुरूच आहे.

Name of the Kevaraband Health Center for ISO | कावराबांध आरोग्य केंद्राचे आयएसओसाठी नामांकन

कावराबांध आरोग्य केंद्राचे आयएसओसाठी नामांकन

गोंदिया : उत्तम आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून जिल्हा व विभागच काय तर राज्यात ओळख असलेल्या कावराबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यशाची वाटचाल सुरूच आहे. यंदा तर मागील अनेक वर्षांपासून भौतिक सुविधांपासून आरोग्य सेवेत सतत तत्परता दाखविणाऱ्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आयएसओसाठी नामांकन झाले आहे.
सन २०१२-१३ पासून सतत या प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्लीच्या चमू येत असून येणाऱ्या प्रत्येक भेटीत त्यांनी आरोग्य केंद्रातील त्रुट्या दर्शवून त्या पुर्ण करण्याचे निर्देश दिले. त्या सूचनांचे तंतोतंत पालन डॉ. विवेक अनंतवार यांनी आपल्या आरोग्य केंद्रात केले. आदिवासी व नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा पुरविणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राने आपला आदर्श कायम ठेवल्यामुळे या आरोग्य केंद्राचे आयएसओ करीता नामांकन झाले आहे.
या आरोग्य केंद्रात आधुनिकेतची जोड देत प्रत्येक सोयी-सुविधा रूग्णांसाठी उपलब्ध केल्या जातात. डॉ. बी.के. मेश्राम जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते तेव्हापासून हे आरोग्य केंद्र आदर्श ठरले आहे. या आरोग्य केंद्रात आताही सर्वात चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.
शासनाचे सर्व उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी या आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशिल राहतात. आरोग्य केंद्राची स्वतंत्र वेबसाईट असो किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय सर्वात आधी या कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्राने हा प्रयोग करून इतरांसाठीही आदर्श निर्माण केला आहे.
आदिवासी व ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात तत्पर असलेले कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्र आयएसओ प्रमाणपत्र घेण्याच्या तयारीत आहे. या आरोग्य केंद्राने केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथील चमू आणखी एकदा येणार. त्यानंतर या आरोग्य केंद्राला आयएसओचे प्रमाणपत्र दिले जाईल.
विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्यातील कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्र आयएसओ साठी नामांकण झालेले पहिले आरोग्य केंद्र आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Name of the Kevaraband Health Center for ISO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.