शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागझिरा अभयारण्य वाघांविनाच!

By admin | Updated: May 11, 2016 01:38 IST

चार अभयारण्य आणि एका राष्ट्रीय उद्यानामुळे तयार झालेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्य

गोंदिया : चार अभयारण्य आणि एका राष्ट्रीय उद्यानामुळे तयार झालेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्य आता वाघांशिवाय पोरके झाले आहे. गेल्या अनेक वर्षांत या अभयारण्यातील ‘माई’ने अनेक वाघांना जन्म घालून व्याघ्र प्रकल्पाच्या समृद्धीत भर घातली. परंतू गेल्या ७ मे रोजी माई कायमची सोडून गेल्यानंतर नागझिरा अभयारण्यात सध्यातरी कोणत्याही वाघाचे अस्तित्व नाही.जिल्ह्यातील नवेगाव अभयारण्यात दोन नर वाघ आणि एका वाघिणीचे वास्तव्य (टी-६ ऊर्फ कानी) आहे. तसेच न्यू नागझिरा अभयारण्यात टी-४ ही वाघीण आपल्या चार महिन्यांच्या दोन छाव्यांसह पर्यटकांच्या नजरेस पडते. कोका अभयारण्यात एक नर वाघ आणि एक वाघिण आहे. नागझिरा अभयारण्यातील माईचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे वनाधिकारी सांगत असले तरी त्यासाठी इतरही कारणे पुढे येत आहेत. वन्यजीव प्रेमींशी चर्चा केल्यावर एक बाब पुढे आली आहे की, नागझिरा जंगल परिसरात हरीण, सांबर, चितळ यासारख्या लहान प्राण्यांची संख्या काहीशी घटली आहे. यामुळेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या वाघांची संख्या या परिसरातील जंगलात कमी होत आहे. या जंगलांमध्ये अवैध शिकारसुद्धा होत आहे. या परिसरातील वाघ (डेंडू), वाघिण (अल्फा) व तिच्या दोन छाव्यांचा आतापर्यंत शोध लागला नाही. वनातील प्राण्यांना वनात तारांचे कुंपण घालून बांधून ठेवता येत नाही. मात्र मागील १० वर्षांत नागझिरा, न्यू नागझिरा किंवा नवेगावबांध येथे वाघांची संख्या का वाढत नाही? हा अनेकांसाठी चिंतनाचा विषय झाला आहे. जर आपल्याकडील वन्य परिसरातून वाघ-वाघिण दुसऱ्या वनात जात आहेत तर मग दुसऱ्या जंगलातील वाघ-वाघिण आपल्याकडील जंगलात का येत नाही? असेही प्रश्न निर्माण होतात. (प्रतिनिधी)सर्वाधिक जुनी वाघीण४नागझिऱ्याची (जुन्या) शान असलेली माई जंगल परिसरातील सर्वाधिक जुनी वाघीण होती. तिने पाच वेळा नागझिरा परिसरात छाव्यांना जन्म दिला आहे. म्हणून तिला ‘माई’ अर्थात मातेची उपमा दिली होती. माईने आतापर्यंत नागझिरा परिसरात १० वाघ-वाघीणींना जन्म दिल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारे माईमुळे या जंगल परिसरात वाघांची संख्या वाढली. पण आता माईचे नागझिरा येथे नसणे ही एक मोठी हानी समजली जाते. नागझिरा परिसरात जखमी होऊन एखाद्या वाघ किंवा वाघिणीचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे.- वन्यजीवांच्या रक्षणासाठी हे करा४ जंगलातील सर्व रस्ते पर्यटकांसाठी उघडण्यात यावे. त्यामुळे शिकाऱ्यांमध्ये व लाकूड चोरामध्ये कोणी येईल याची भिती राहील. त्यातून शिकारीला आळा बसू शकेल, असे मत वन्यजीव प्रेमी राहुल हारोडे यांनी व्यक्त केले.४ सुनील धोटे यांनी म्हटले की, माईच्या मृत्यूवर गांभीर्याने मंथन आवश्यक आहे. अशी घटना पुन्हा होवू नये. जखमी वन्यप्राण्यांवर योग्यवेळी उपचारासाठी शासकीय तयारी असावी.४ डॉ.राजेंद्र जैन म्हणाले, नागझिरा जंगलात अनेक वाघ-वाघिण आले व गेले. परंतु माईच १५ वर्षांपासून कधीही नागझिरा सोडू शकली नाही. पर्यटक विनोदात म्हणायचे, ‘वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन केवळे माईमुळेच निघते. वेतन बिलाच्या मस्टरवर माईचे पगमार्क घेण्यात यावे.’