चुरडी हत्याकांडाचे गूढ त्वरित उलगडा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:30 IST2021-09-25T04:30:52+5:302021-09-25T04:30:52+5:30

तिरोडा : तालुक्यातील चुरडी येथील एकाच कुटुंबातील चारजणांची हत्या झाल्याच्या घटनेला चार दिवसांचा कालावधी लोटला आहे, पण अद्यापही या ...

Mystery of Churdi massacre unraveled immediately () | चुरडी हत्याकांडाचे गूढ त्वरित उलगडा ()

चुरडी हत्याकांडाचे गूढ त्वरित उलगडा ()

तिरोडा : तालुक्यातील चुरडी येथील एकाच कुटुंबातील चारजणांची हत्या झाल्याच्या घटनेला चार दिवसांचा कालावधी लोटला आहे, पण अद्यापही या हत्याकांडाचा उलगडा झाला नाही. या घटनेमुळे समस्त समाजबांधवांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पोलीस विभागाने या प्रकरणाचा त्वरित छडा लावून आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी बिसेन यांच्या परिवारातील सदस्यांनी आ. विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि.२४) जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनातून केली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनातून २१ सप्टेंबर रोजी आमच्या परिवारातील सदस्य रेवचंद बिसेन, मालता बिसेन, तेजस बिसेन व पाेर्णिमा बिसेन यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. ही घटना केवळ गोंदिया जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे. या प्रकरणातील आरोपींचा अद्यापही शोध न लागल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित छडा लावून यातील गूढ सोडवावे, तसेच बिसेन परिवाराला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. यावेळी बिसेन परिवारातील डॉ. हेतराम बिसेन, केवल बिसेन, सुधाकर बिसेन, प्रफुल्ल बिसेन आणि आ. विजय रहांगडाले, ॲड. माधुरी रहांगडाले उपस्थित होते.

Web Title: Mystery of Churdi massacre unraveled immediately ()