मुर्री रोडवासीयांचे ‘बल्ले-बल्ले’

By Admin | Updated: April 30, 2015 01:04 IST2015-04-30T01:04:27+5:302015-04-30T01:04:27+5:30

उखडलेला रस्ता व त्यात रस्ता दुभाजक यामुळे त्रासून गेलेल्या चंद्रशेखर वॉर्ड मुर्री रोडवासीयांनी आगळ््यावेगळ््या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Murri Road residents 'bat-bat' | मुर्री रोडवासीयांचे ‘बल्ले-बल्ले’

मुर्री रोडवासीयांचे ‘बल्ले-बल्ले’

गोंदिया : उखडलेला रस्ता व त्यात रस्ता दुभाजक यामुळे त्रासून गेलेल्या चंद्रशेखर वॉर्ड मुर्री रोडवासीयांनी आगळ््यावेगळ््या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शिवाय राजकारण्यांचे हात-पाय न जोडता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडली. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश लाभले असून खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याला भेट देत एका महिन्याच्या आत रस्ता बांधकामाचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
येथील मुर्री रोड रस्ता अगोदरच अरूंद असून पूर्णपणे उखडलेला आहे. अशात या रस्त्यावर पालिकेने रस्ता दुभाजक तयार केल्याने हा रस्ता अधिकच अरूंद झाला आहे. उखडलेल्या रस्त्यामुळे दररोज येथे अपघात घडत आहेत.
या प्रकारामुळे या मार्गावरील नागरिक त्रस्त असून त्यांनी कुणा राजकारण्यांचे हात-पाय न जोडता आपला रोष एका होर्डीगच्या माध्यमातून व्यक्त केला. त्यांची ही शक्कल शहरात चांगलीच फेमस झाली व सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
मात्र एवढ्यावरही काहीच न झाल्याने येथील नागरिकांनी मंगळवारी (दि.२८) थेट जिल्हाधिकारी विजय सुयर्वंशी यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली समस्या मांडली. एवढेच नव्हे तर त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. या नागरिकांची समस्या लक्षात घेत जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सोबत घेत मुर्री रोडची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना या रस्त्यावरील विद्युत खांब हटवून एका महिन्याच्या आत रस्ता दुरूस्त करण्याचे आदेश दिले. तर नगरपरिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण हटविण्याचेही आदेश दिले.
दरम्यान बुधवारी (दि.२९) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू यांनीही रस्त्याची पाहणी केली. विशेष म्हणजे या रस्त्याच्या विषयाला घेऊन जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी बुधवारी दुपारी संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली असल्याचीही माहिती आहे. एकंदर मुर्री रोडी वासीयांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांची बल्ले-बल्ले झाली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Murri Road residents 'bat-bat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.