आर्थिक व्यवहारावरून युवकाचा धारदार शस्त्राने खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:34 IST2021-01-16T04:34:01+5:302021-01-16T04:34:01+5:30
गोंदिया: आर्थिक व्यवहाराला घेऊन शहराच्या रिंगरोडवरील सहयोग हॉस्पिटल परिसरात धारदार शस्त्राने वार करून एका युवकाची हत्या करण्यात आली. हा ...

आर्थिक व्यवहारावरून युवकाचा धारदार शस्त्राने खून
गोंदिया: आर्थिक व्यवहाराला घेऊन शहराच्या रिंगरोडवरील सहयोग हॉस्पिटल परिसरात धारदार शस्त्राने वार करून एका युवकाची हत्या करण्यात आली. हा हल्ला करणारे चार आरोपी हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रविप्रसाद राधेलाल बंभारे (३५) रा. लोधीटोला असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
१४ जानेवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास रविप्रसाद याच्यावर चार इसमांनी धारदार शस्त्राने वार केले. पोटावर व शरीरावर अनेक ठिकाणी घाव घालण्यात आले. सपासप वार केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. घटनेची वार्ता शहरात झपाट्याने पसरली.या संदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचे छायाचित्र हॉस्पिटलच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीने कैद केले आहे. आरोपींना राग एवढा होता की त्यांनी धारदार शस्त्राने १५ ते २० घाव त्याच्यावर घातले. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचे तपासी अधिकारी ठाणेदार प्रमोद घोंगे यांनी सांगितले. आतापर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.