अनैतिक संबंधातून तरूणाचा खून ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:30 IST2021-05-07T04:30:25+5:302021-05-07T04:30:25+5:30

गोंदिया : पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे पतीने नातेवाईकाच्या मदतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केला. ही घटना ४ मे च्या ...

Murder of a teenager in an immoral relationship () | अनैतिक संबंधातून तरूणाचा खून ()

अनैतिक संबंधातून तरूणाचा खून ()

गोंदिया : पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे पतीने नातेवाईकाच्या मदतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केला. ही घटना ४ मे च्या रात्री घडली. लोखंडी साबळीने खून केल्यानंतर मृतदेह डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरुन तिडकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या झुडपात टाकला. दुर्गेश सावलराम लोले (३२) रा. सडक-अर्जुनी असे मृतकाचे नाव आहे.

मृतक दुर्गेश याचे आरोपीची पत्नीसह अनैतिक संबंध होते. त्यामुळे तो त्याला खुपत होता. याच कारणावरुन पती संतोष प्रेमलाल बडोले व त्याच्या नातेवाईकांनी लोखंडी साबळीने दुर्गेशच्या डोक्यावर मारून ठार केले. त्याचा मृतदेह तिडका गावाकडे जाणाऱ्या नर्सरीच्या एका झुडपात लपवून ठेवला होता. दुर्गेशचे आरोपीच्या पत्नीसह मागील ४ ते ५ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. ठाणेदार सचिन वांगडे यांनी आरोपीची पत्नी, संतोष बडोले व विशाल राऊत यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. दरम्यान आरोपी संतोष बडोले यांने आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे ४ मे च्या रात्री १० वाजता दुर्गेशच्या डोक्यावर साबळने मारून खून केल्याची कबुली दिली. मृतदेह सावंगी-तिडका रस्त्याच्या झुडपामध्ये टाकण्यासाठी विशाल शंकर राऊत व साबळीचे डाग धुवून काढण्यासाठी पत्नीने मदत केल्याचे तपासात उघडकीस आले. युद्धराज सावलदास लोले (३३) रा. सडक-अर्जुनी यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालंदर नालकूल करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस हवालदार हरिश्चंद्र शेंडे, जगदेश्वर बिसेन, चालक पोलीस हवालदार रमेश हलामी, पोलीस नाईक झुमन वाढई, मनोहर गावडकर,उत्तम दहिवले यांनी केली आहे.

Web Title: Murder of a teenager in an immoral relationship ()