शिवीगाळ करणाऱ्या दारुड्याचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST2021-07-27T04:30:20+5:302021-07-27T04:30:20+5:30

गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बनाथर येथील नेहमी दारू पिऊन मोहल्ल्यातील लोकांना शिवीगाळ करणाऱ्या एका दारुड्याला २४ जुलैच्या ...

Murder of an abusive drunkard | शिवीगाळ करणाऱ्या दारुड्याचा केला खून

शिवीगाळ करणाऱ्या दारुड्याचा केला खून

गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बनाथर येथील नेहमी दारू पिऊन मोहल्ल्यातील लोकांना शिवीगाळ करणाऱ्या एका दारुड्याला २४ जुलैच्या दुपारी ३ वाजता बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या इसमाचा मृत्यू झाला. या संदर्भात पाच जणांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कैलास भजनदास मोरध्वज (४०) रा. बनाथर असे मृताचे नाव आहे. कैलास मोरध्वज हा नेहमी दारू पिऊन मोहल्ल्यातील लोकांना शिवीगाळ करीत असे. मोहल्लातील लोकांनी २४ जुलैच्या दुपारी ३ वाजता आरोपी सतीश जयलाल ठाकरे (४५), राजेश कुवरलाल सरवरे (३५), रतिराम होलीराम बिनाखे (६०), सुरेश रतिराम बिनाखे (३५) सर्व रा. बनाथर व मोतीराम होलीराम बिनाखे (४८) रा. चंगेरा या पाच जणांनी त्याला लाथाबुक्क्यांनी त्याच्या घरात घुसून बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या कैलासला उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता २५ जुलै रोजी पहाटे १.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, ४५०,३२३, ३२४,१४१,१४३,१४७,१४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.

Web Title: Murder of an abusive drunkard