माताटोली येथील अतिक्रमणाकडे नगर परिषदेची डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST2021-02-06T04:53:31+5:302021-02-06T04:53:31+5:30
गोंदिया : शहरातील माताटोली परिसरात काही नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. तसेच घर बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून ठेवले असल्याने ...

माताटोली येथील अतिक्रमणाकडे नगर परिषदेची डोळेझाक
गोंदिया : शहरातील माताटोली परिसरात काही नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. तसेच घर बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून ठेवले असल्याने रस्त्यावरून ये-जा करण्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात अनेकदा नगर परिषदेला निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. परिणामी नागरिकांची समस्या कायम आहे.
प्राप्त माहितीनुसार माताटोली परिसरात काही नागरिकांच्या घरांचे बांधकाम सुरू आहे. घर बांधकामासाठी लागणारी रेती, विटा व गिट्टी रस्ता आणि नालीवर टाकण्यात आली. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करण्यास नागरिकांना अडचण होत आहे. नाल्यांमध्ये रेती साचून असल्याने सांडपाण्याचा निचरासुध्दा हाेत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही समस्या मार्गी लावण्यात यावी, यासाठी नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली. पण, त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या कायम आहे. याची दखल घेऊन अतिक्रमणाची समस्या मार्गी लावण्याची मागणी या वाॅर्डातील नागरिकांनी केली आहे.