पालिकेच्या तिजोरीत आले ७३ लक्ष रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST2020-01-01T06:00:00+5:302020-01-01T06:00:13+5:30

नगर परिषदेला मालमत्ता कर व बाजार भाडे हे दोनच महत्त्वाचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आहे. यातूनच नगर परिषदेला कोट्यवधी रूपयांची आवक होते. त्यातूनच नगर परिषदेचा कारभार चालतो. मात्र कर वसुलीत गोंदिया नगर परिषदेची स्थिती अत्यंत बिकट आहे. मागणी पेक्षा थकबाकी जास्त अशी आजची गत आहे.

Muncipal corporation have Rs 73 lac | पालिकेच्या तिजोरीत आले ७३ लक्ष रूपये

पालिकेच्या तिजोरीत आले ७३ लक्ष रूपये

ठळक मुद्देमालमत्ता व बाजार भाडे वसुली : घुगेंच्या पाठबळाने कर्मचाऱ्यांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेचे कामकाज वठणीवर आणतानाच नगर परिषदेची तिजोरी भरण्याचे कामही प्रभारी मुख्याधिकारी रोहन घुगे यांनी केले. त्यांच्या पाठबळाने कर्मचाऱ्यांनी कर वसुली मोहीम जोमात राबवून महिनाभरातच चक्क ७३ लक्ष ४६ हजार ३५४ रूपयांची वसुली आणून पालिकेच्या तिजोरीत जमा केले आहे. यात ४४ लक्ष ६० हजार २१ रूपये मालमत्ता कर वसुलीचे असून ७३ लक्ष ४६ हजार ३५४ रूपये बाजार भाडे वसुलीतून आले आहेत.
नगर परिषदेला मालमत्ता कर व बाजार भाडे हे दोनच महत्त्वाचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आहे. यातूनच नगर परिषदेला कोट्यवधी रूपयांची आवक होते. त्यातूनच नगर परिषदेचा कारभार चालतो. मात्र कर वसुलीत गोंदिया नगर परिषदेची स्थिती अत्यंत बिकट आहे. मागणी पेक्षा थकबाकी जास्त अशी आजची गत आहे. राजकीय हस्तक्षेप व नेतृत्त्वाचा अभाव या कारणांमुळे कर वसुलीसाठी जाणाºया कर्मचाºयांना रिकाम्या हाती यावे लागत असल्याचे चित्र नगर परिषदेत बघावयास मिळते. यामुळेच कोट्यवधींच्या घरात थकबाकी असून हा आकडा वर्षानुवर्षे वाढतच चालला आहे. परिणामी नगर परिषदेची तिजोरी नेहमीच रिकामीच राहत आहे. परिणामी शहरवासीयांना नागरी सुविधा पुरविण्यात नगर परिषद अपयशी ठरत आहे.
हा सर्व प्रकार सुरू असतानाच, सह जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी महिनाभरासाठी नगर परिषदेचा कारभार हाती घेतला. या कार्यकाळात त्यांनी नगर परिषदेचे कामकाज सुरळीत केले असतानाच रिकामी पडून असलेली तिजोरी भरण्यातही कसर सोडली नाही.
मालमत्ता व बाजार विभागाचा आढावा घेतला असता दोन्ही विभागांची बिकट स्थिती त्यांच्या नजरेत आली. त्यांनी मालमत्ता व बाजार भाडे वसुलीसाठी आदेश दिले. विशेष म्हणजे, कर भरण्यास नकार देणाºयांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कर वसुली पथकाने त्यांच्या २८ डिसेंबरपर्यंतच्या कार्यकाळात चक्क ७३ लक्ष ४६ हजार ३५४ रूपयांची मालमत्ता व बाजार भाडे वसुली आणून नगर परिषदेच्या तिजोरीत जमा केले आहे.

पथकाने दुकानही केले सील
मुखीया दमदार असल्यास कार्यकर्ते दिमाखदार कामगिरी करतात याची प्रचिती नगर परिषद कर्मचाºयांची करून दाखविली. घुगे यांनी थेट कारवाई करण्याचे आदेश देत काही अडचण आल्यास ते बघून घेणार एवढा विश्वास दाखविल्याने कर्मचारीही चांगलेच जोमात दिसून आले. घुगे यांचे पाठबळ असल्याने कर्मचाºयांनी वसुलीसाठी निघत भाडे थकविणाºयांचे दुकान सील करण्यास सुरूवात केली. परिणामी व्यवसायी वठणीवर आले व त्यांनी दुकान सील करण्याची कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता व भाडे भरून सहकार्य केले. नगर परिषदेला यापुर्वी असे नेतृत्व मिळाले नाही अन्यथा नगर परिषदेची स्थिती अशी राहिली नसती असे आता कर्मचारीच बोलत आहेत.
५१ लक्ष रोख तर २२ लक्षचे धनादेश
नगर परिषद मालमत्ता कर व बाजार विभागाने घुगे यांच्या कार्यकाळात ७३ लक्ष ४६ हजार ३५४ रूपयांची वसुली आणली आहे. यात मालमत्ता कर विभागाचे ४४ लक्ष ६० हजार २१ रूपये असून बाजार विभागाचे २८ लक्ष ८६ हजार ३३३ रूपये आहेत. दोन्ही विभागांनी आणलेल्या या वसुलीत ५१ लक्ष १९ हजार ०२८ रूपयांची रोख रक्कम आहे. तर २२ लक्ष २७ हजार ३२६ रूपयांचे धनादेश आहेत.एवढी मोठी रक्कम वसुली पथकाने महिनाभरात तेही कर वसुलीचा हंगाम नसताना आणली असल्याने नगर परिषद लखपती बनली आहे.

Web Title: Muncipal corporation have Rs 73 lac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.