जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार मुंबई मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST2021-02-24T04:31:09+5:302021-02-24T04:31:09+5:30

गोंदिया : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक दि. २५ ...

Mumbai Manthan to be held on Zilla Parishad elections | जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार मुंबई मंथन

जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार मुंबई मंथन

गोंदिया : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक दि. २५ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता राजीव गांधी भवन मुंबई येथे आयोजित केली आहे. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आनुषंगाने मंथन करण्यात येणार आहे.

बैठकीत गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचा आढावा घेण्यात येणार असून, संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष, जिल्ह्याचे पालक व संपर्कमंत्री, जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी पदाधिकारी, जिल्ह्यातील आजी माजी खासदार व मागील लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व ब्लॉकचे अध्यक्ष, जिल्ह्यातील महानगरपालीका निवडणुकीसाठी प्रदेश कार्यालयाने नियुक्त केलेले निरीक्षक, प्रदेश प्रतिनिधी, सर्व आघाडी संघटनांचे जिल्हा अध्यक्ष, सर्व विभाग व सेलचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमधील आजी-माजी सदस्य उपस्थित राहणार आहे.

Web Title: Mumbai Manthan to be held on Zilla Parishad elections