सालेकसा न.पं.च्या निवडणुकीसाठी हालचाली

By Admin | Updated: March 11, 2017 00:17 IST2017-03-11T00:17:38+5:302017-03-11T00:17:38+5:30

सालेकसा ग्राम पंचायत बरखास्त करुन मागील दोन वर्षापासून प्रशासक नसलेल्या नगर पंचायत सालेकसाला आतापर्यंत

Movement for election of Salekasa NP | सालेकसा न.पं.च्या निवडणुकीसाठी हालचाली

सालेकसा न.पं.च्या निवडणुकीसाठी हालचाली

मतदारयादीचा सुधारित कार्यक्रम : आमगाव खुर्दचा समावेश नसल्याने अडचणीची शक्यता
सालेकसा : सालेकसा ग्राम पंचायत बरखास्त करुन मागील दोन वर्षापासून प्रशासक नसलेल्या नगर पंचायत सालेकसाला आतापर्यंत लोकशाही पद्धतीने सरकार मिळाले नाही. निवडणूक आयोगाने आता सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग येत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान आमगाव खुर्द ग्रामपंचायतला सुद्धा नगर पंचायतीत समाविष्ठ करावे म्हणून मागील वर्षी निवडणुकीवर स्थगिती आणण्यात आली होती. परंतू आतापर्यंत आमगाव खुर्दला समाविष्ट करण्याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे फक्त सालेकसाची निवडणूक घेणार, की पुन्हा स्थगिती आणून आमगाव खुर्दला नगर पंचायतीत सहभागी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, याबद्दल पुन्हा संशयाचे वातावरण निर्माण होत आहे.
नगर पंचायत सालेकसा येथे निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात मतदार याद्यांच्या कार्यक्रमाला वेग आला आहे. परंतु दुसरीकडे आमगाव खुर्दला समाविष्ट न केल्यामुळे पुन्हा आमगाव खुर्दवासीय अस्वस्थ झाले आहेत. काही लोक पुन्हा कोर्टात धाव घेण्याच्या तयारीला लागले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

निवडणूक आयोगाला अवमानना नोटीस
गुरुवार ९ मार्चला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात नगरविकास सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर आणि निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांना अवमानना नोटीस बजावली आहे. २०१५ ला आमगाव खुर्द येथील ग्रा.पं.सदस्य ब्रजभूषण बैस आणि वासुदेव चुटे यांनी आमगाव खुर्द ग्रामपंचायतीला सालेकसा नगर पंचायतीत समावेश करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या आधारावर न्यायालयाने सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक घेण्यावर स्थगिती आणून आमगाव खुर्दचा न.पं.मध्ये समावेश करण्याची प्रक्रिया करुन निवडणूक घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु शासनाने न्यायालयाच्या त्या सल्ल्यावर अंमलबजावणी न करता पुन्हा फक्त सालेकसाला नगर पंचायत बनवून निवडणूक घेण्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यामुळे न्यायालयाने दोघांना अवमानना नोटीस बजावली आहे. आता नगर पंचायत सालेकसाची निवडणूक होणार की आमगाव खुर्दला समाविष्ट करणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

असा आहे कार्यक्रम
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ८ मार्च २०१७ रोजी निगर्मित केलेल्या आदेशाप्रमाणे सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक घेण्यासाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १० मार्च २०१७ ला प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, १० मार्च ते १६ मार्चदरम्यान प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची संधी देणे, १८ मार्चला प्रभागनिहाय अंतीम मतदार याद्या तयार करणे आणि मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे, २० मार्च रोजी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे असा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

 

Web Title: Movement for election of Salekasa NP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.