माता मृत्यूबाबत अहवाल मागितला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 21:37 IST2017-10-01T21:37:27+5:302017-10-01T21:37:39+5:30

गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी येथील ललिता भुमेश्वर पंधरे (२२) या नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा १५ सप्टेबर रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Mother's report requested for death | माता मृत्यूबाबत अहवाल मागितला

माता मृत्यूबाबत अहवाल मागितला

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांकडून आस्थेने चौकशी : घरी भेट देऊन घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी येथील ललिता भुमेश्वर पंधरे (२२) या नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा १५ सप्टेबर रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मातामृत्यू झालेल्या घरी कुºहाडी येथे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी २८ सप्टेबर रोजी भेट दिली. तिच्या पती व सासूकडून गर्भवती असतानाच्या काळात कशाप्रकारे आहार देण्यात येवून काळजी घेण्यात आली, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. मातामृत्यू झालेल्या या महिलेचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाºयांना दिले.
जिल्हाधिकारी काळे यांच्या भेटीप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी आर.टी. शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.डी. पाचे, कुºहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देव चांदेवार, डॉ. किर्तीकुमार चुलपार प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शून्य माता व बालमृत्यू अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश कोणत्याही गर्भवती महिलेचा बाळंतपणादरम्यान मृत्यू होऊ नये तसेच जन्माला येणाºया बालकांचादेखील मृत्यू होऊ नये, हा आहे. सर्व बाळंतपणे आरोग्य संस्थेतच झाली पाहिजे. घरी सर्व कामे महिला करीत असताना बाळंतपणाच्या काळात महिलांची घरच्या पुरुष मंडळींनी योग्य काळजी घेतली पाहिजे. तसेच तिच्या आहाराकडे देखील लक्ष दिले पाहिजे. बाळंतपणाच्या काळात घरची पुरूष मंडळी त्या महिलेच्या आरोग्याकडे लक्ष देतात की नाही, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व प्रत्येक गावात प्रत्येक महिन्याला निश्तिच केलेल्या दिवशी पती किंवा सासºयांची सभा आयोजित करण्यात येत आहे. या सभा घेण्यामागचा उद्देश माता व बालमृत्यू टाळणे हाच आहे.
कुºहाडी येथील मातामृत्यू झालेल्या ललिता पंधरे यांची प्रकृती ज्या दिवशी अचानक बिघडली त्या दिवशी तिला कुºहाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे तिला गोंदिया येथील बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात भरती करण्यासाठी नेले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाºयांनी दोनदा परत केल्याची माहिती मयत महिलेचे पती भूमेश्वर पंधरे व सासू यांनी जिल्हाधिकाºयांना दिली.या वेळी २४ व २८ आॅगस्ट रोजी गर्भवती महिलेच्या घरच्या मंडळीसाठी घेण्यात आलेल्या सभेत आपण गेलो होतो, असे भूमेश्वरने सांगितले. सभेत वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य मार्गदर्शन केले. बाळंतपणाच्या वेळी पत्नीचे वजन ४१ किलो होते. ३ व ५ आॅगस्टला बाई गंगाबाई रु ग्णालयातून परत पाठविल्याचे त्याने सांगितले. पुढील उपचारासाठी नागपूरला नेले. घरी परिस्थिती हलाखीची असताना सुध्दा नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले. औषधी, इंजेक्शनसुध्दा तेथे बाहेरुनच खरेदी करून आणावे लागत असल्यामुळे दररोज १५०० रूपये खर्च होत होते. जवळपास १३ दिवस तिथे ठेवण्यात आले. पैसा संपल्यामुळे परत गोंदियाला केटीएस रूग्णालयामध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले.
जिल्हाधिकारी काळे यांनी यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे यांना सूचना केली की, त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय अधिकाºयांनी अशा अडचणीच्या प्रसंगी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची मदत घ्यावी. गर्भवती महिलांच्या घरी आरोग्य कर्मचारी नियमित भेट देतील, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतील. एकीकडे शासन आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत असताना बाळंतपणाच्या काळात मातामृत्यू झालेल्या कुटुंबाला एवढा खर्च कसा आला असेल, याचा शोध घेणे गरजचे आहे.

Web Title: Mother's report requested for death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.