आई व पत्नीच्या मारेकऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:09+5:30

राजेश शालिकराम गजभिये (३७,रा.सुपलीपार) याने २४ ऑक्टोबर रोजी लोखंडी साबळीने आई आनंद उर्फ सुनंदा शालिकराम गजभिये हिच्या डोक्यावर साबळीने मारुन तसेच पत्नी पुनम राजेश गजभिये हिचा स्लॅक्सने गळा आवळून व नंतर सब्बलने डोक्यावर मारुन खून केला होता. त्यानंतर स्वत:ची मोटारसायकल घेवून पसार तो झाला.

Mother, wife arrested for murder | आई व पत्नीच्या मारेकऱ्याला अटक

आई व पत्नीच्या मारेकऱ्याला अटक

Next
ठळक मुद्देसुपलीपार येथील प्र्रकरण : छत्तीसगडच्या महासमुंद येथून अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आई व पत्नीला माहित न करता दिड लाख रुपये कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड दिवाळीपर्यंत करणार असे ठणकावून सांगितले होते. परंतु दिवाळीपर्यंत पैशांची व्यवस्था होणार नाही आणि कर्ज देणारा घरी येईल या भितीपोटी स्वत:च्या आई व पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आमगाव तालुक्यातील ग्राम सुपलीपार येथे २४ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेतील आरोपीला १५ दिवसानंतर छत्तीसगडच्या महासमुंद येथून गुरूवारी (दि.७) पहाटे ४.२३ वाजता अटक केली.
राजेश शालिकराम गजभिये (३७,रा.सुपलीपार) याने २४ ऑक्टोबर रोजी लोखंडी साबळीने आई आनंद उर्फ सुनंदा शालिकराम गजभिये हिच्या डोक्यावर साबळीने मारुन तसेच पत्नी पुनम राजेश गजभिये हिचा स्लॅक्सने गळा आवळून व नंतर सब्बलने डोक्यावर मारुन खून केला होता. त्यानंतर स्वत:ची मोटारसायकल घेवून पसार तो झाला. त्याची मोटारसायकल मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील किरनापुर येथे आढळली होती. एकाच कुटुंबातील दोघांचा खून झाल्यामुळे या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांना अगत्याचे होते.
सतत १५ दिवस जागून सुगावा लावण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड अशा तीन राज्याच्या सीमेत पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.
त्यात १५ दिवसानंतर गुरूवारी (दि.७) छत्तीसड राज्यातील महासमुंद येथून आरोपी राजेश गजभिये (३७) याला अटक करण्यात आली.
अंगावर असलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या भितीतून त्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक संजय सिंह, बलराज लांजेवार, कटरे, सुर्यवंशी यांनी केली. आरोपीला सोमवारपर्यंत (दि.११) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Mother, wife arrested for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून