बाधित रुग्णांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST2021-02-10T04:29:47+5:302021-02-10T04:29:47+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने खाली येत असल्याने काेरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने खालावत आहे. दोन तालुके कोरोनामुक्त ...

बाधित रुग्णांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने खाली येत असल्याने काेरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने खालावत आहे. दोन तालुके कोरोनामुक्त झाले असून, लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. बाधित रुग्णांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
मंगळवारी जिल्ह्यात २ नवीन रुग्णांची नोंद झाली तर १२ बाधितांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी आढळलेल्या दोन रुग्णांमध्ये गोंदिया येथील १ आणि बाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ६६,९०५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ५५,२४९ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ६६,३७० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ६०,२३७ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,२६२ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १३,९९९ जणांनी कोरोनावर मात केली. सद्य:स्थितीत ८० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.