मोहफुल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST2021-05-12T04:30:05+5:302021-05-12T04:30:05+5:30

गोंदिया: डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फुटाळा सौंदड येथील मोहफुलापासून गाळण्यात येणाऱ्या हातभट्टीवर धाड घालून ७२० किलो मोहफुल, ४ लिटर ...

Mohful and distillery confiscated () | मोहफुल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त ()

मोहफुल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त ()

गोंदिया: डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फुटाळा सौंदड येथील मोहफुलापासून गाळण्यात येणाऱ्या हातभट्टीवर धाड घालून ७२० किलो मोहफुल, ४ लिटर मोहफुलाची दारू व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई ११ मे रोजी करण्यात आली.

फुटाळा सौदड येथील चुलबंद नदी किनाऱ्यावर संतोष राजीराम बनकर रा.सौंदड हातभट्टी लावून मोहाफुलाची दारू काढत असताना दारू गाळण्याचे ०२ लोखंडी ड्रम, १२ प्लास्टिक पॉलिथीनमध्ये प्रत्येकी ६० किलो प्रमाणे ७२० किलो मोहफूल, ४ लिटर हातभट्टीची दारू असा एकूण ६४ हजार ५९० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी संतोष राजीराम बनकर, सचिन एकनाथ मांडारकर, मुकेश आसाराम चाचेरे तिन्ही रा. सौदड यांच्या विरुध्द दारुबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार रविशंकर चौधरी करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार सचिन वांगडे, पोलीस हवालदार रविशंकर चौधरी, पोलीस नाईक उत्तम दहीवले, अनिल पटीये, चालक पोलीस नायक राहुल वाटोरे यांनी केली आहे.

Web Title: Mohful and distillery confiscated ()