१.८६ लाखांचा मोहा सडवा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:45+5:302021-03-18T04:28:45+5:30
तिरोडा : अवैध दारू विक्रेत्याविरोधात कंबर कसून असलेल्या तिरोडा पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्रेत्यांना आणखी दणका दिला आहे. पोलिसांनी ...

१.८६ लाखांचा मोहा सडवा जप्त
तिरोडा : अवैध दारू विक्रेत्याविरोधात कंबर कसून असलेल्या तिरोडा पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्रेत्यांना आणखी दणका दिला आहे. पोलिसांनी बुधवारी (दि.१७) सकाळीच केलेल्या ५ कारवायांत १ लाख ८६ हजार रूपयांचा मोहा सडवा जप्त केला असून एक भट्टी उधळून लावली आहे.
होळीच्या सणाला बघता तिरोडा पोलिसांनी बुधवारपासून या कारवाया सुरू केल्या या अंतर्गत ५ अवैध दारू विक्रेत्यांवर धाड टाकण्यात आली. यामध्ये कविता सेवाकराम तांडेकर (रा. संत रविदास वॉर्ड) हिच्या घरातून १८ प्लास्टिक चुंगडीत २८ हजार ८०० रूपये किमतीचा ३६० किलो सडवा मोहफूल, शीला विनोद खरोले (रा. संत रविदास वॉर्ड) हिच्या घरातून २२ प्लास्टिक चुंगडीत ३५ हजार २०० रूपये किमतीचा ४४० किलो सडवा मोहफूल, पूर्णा प्रल्हाद तांडेकर (रा. संत रविदास वॉर्ड) हिच्या घरातून १५ प्लास्टिक चुंगडीत २४ हजार रूपये किमतीचा ३०० किलो सडवा मोहफूल, धीरज प्रकाश बरेकर (रा. संत रविदास वॉर्ड) याच्या घरातून ५६ प्लास्टिक चुंगडीत ८९ हजार ६०० रूपये किमतीचा ११२० किलो सडवा मोहाफूल जप्त केला. तसेच, साबीर रहीम खा पठाण (रा. संत रविदास वॉर्ड) याच्या घरी धाड घातली असता दारू भट्टी लावून दारू काढणे सुरू असल्याचे दिसले. यावर पोलिसांनी सुरु असलेली भट्टी उधळून लावली असून १० लिटर मोहा दारू, ४ प्लास्टिक चुंगडीत ८० किलो सडवा मोहफूल व मोहा दारू काढण्याचे साहित्य असा एकूण ८ हजार ६५० रूपयांचा माल जप्त केला. अशाप्रकारे ५ ठिकाणी घातलेल्या धाडीत पोलिसांनी एकूण १ लाख ८६ हजार २०० रूपयांचा माल जप्त केला आहे. तसेच धीरज प्रकाश बरीयेकर याला दारू अड्ड्यांवरून अटक केली असून आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.