आधुनिकतेत बैलजोडीच्या घुंगरांचा आवाज लुप्त
By Admin | Updated: March 25, 2015 01:14 IST2015-03-25T01:14:29+5:302015-03-25T01:14:29+5:30
जमाना वायफायचा आहे. इंटरनेट व्हॉट्सअपच्या काळात बदल जलद झाले हे कळलेच नाही. संपर्कासाठी एक ना अनेक माध्यमे आली.

आधुनिकतेत बैलजोडीच्या घुंगरांचा आवाज लुप्त
अर्जुनी-मोरगाव : जमाना वायफायचा आहे. इंटरनेट व्हॉट्सअपच्या काळात बदल जलद झाले हे कळलेच नाही. संपर्कासाठी एक ना अनेक माध्यमे आली. त्यासोबतच वाहतुकीची शेकडो माध्यम सुध्दा वर्तमानात वाढली आहेत. प्रत्येक गावात माल वाहतुकीसाठी छोटा गाडी असतेच. मालवाहक गाड्यानी घुगरांची गाडी म्हणजेच महाराष्ट्राची एक ओळख सांगणाच्या बैलगाडीला कधिचेच मागे टाकले परंतु आजही तिचे महत्व कमी झालेले नाही.
काही वर्षे मागे पाहिले तर दळणवळणाच्या सोयी तर दुरची गोष्ट. परंतु पक्का डांबरी रस्ता सुध्दा ग्रामीण भागात नव्हता. दुरवर असलेल्या नातलगाची खुशाली. घेण्यासाठी पोस्ट कार्यालयात किंवा ट्रॅक कॉल बुक करावा लागत असे. आता हातात मोबाईल आल्याने सार काही एकदम सहज आले आहे.
वाहतुकीच्या बाबतीत विचार केल्यास बैलगाडीच वाहतुकीचे प्रभावी माध्यम होते. काळ बदलला ताबड्या रस्त्याचे काळे पांढरे रस्ते झाले. यंत्रतंत्राची वाहने आली सार काही बदल झाले. पण बदलत्या काळात मात्र बैलगाडी काही प्रमाणात अस्तित्व टिकवून आहे.
ग्रामीण भागातील काही शेतकरी शेतमाल आजही बैलगाडीने अड्याळ येथील आठवडी बाजारात नेत आणत असल्याचे आढळते. परंतु तो आवाज नाही आणि बैलबंड्याची संग सुध्दा पहायला मिळत नाही. पूर्वी गोंदिया जिल्ह्यातील काही ठराविक आठवडी बाजारात दुकान लावायला जागा उरत नव्हती. उलट नाइलाजास्तव दुकान बंडीत व बैल कोणाच्याही घरच्या आडाला बांधुन ठेवावे लागत असे. आज जागा आहेत दुकाने नाहीत आणि ज्यांचे दुकाने आहेत त्यांचे व्यवसाय होत नाही.
काही वर्षाआधी याच बैलगाडी शिवाय ग्रामीण भागात वाहतुकीचा अन्य पर्याय नव्हता मग कुणाचा लग्न असो वा कुठली जत्रा. रात्रीला सोबत दिवा असला की झाल समाधान एकाच वेळी २०-२० बैलगाड्या एकामागे एक जशी रेलगाडीच लागली. वाटेतल्या प्रवासात एकमेकांना ओव्हरटेक करुन मिशीला ताव मारण्याची गमत निराळीच.
वाहतुकीची माध्यमे वाढली प्रत्येक गावात मालवाहक टेम्पो आले व बैलगाडी मागे पडली. शेतकऱ्यांच्या घरी पॉवर टिलर टॅक्ट्रर आल्याने बैलजोडी बाळगणे अव्यवहार्य वाटू लागल्याने याचा परिणाम बैलगाडी वाहतुक बंद पडण्यावर आला. पण म्हणून काय तिचे महत्व कमी झालेल नाही.
जलद वाहतुकीच्या कितीही सुविधा निर्माण झाल्या तरी ग्रामीण जिवनाचा अविभाज्य भाग बनलेली बैलगाडी बैलाच्या घुंगराचा आवाज मात्र मंदावला आहे. (प्रतिनिधी)