मोबाईल चोरट्यांच्या टोळीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:31 IST2021-01-19T04:31:19+5:302021-01-19T04:31:19+5:30

गोंदिया : आमगाव खुर्द-सालेकसा येथील भाटिया ट्रेडर्सचे शटर तोडून आठ लाख नऊ हजार ६११ रुपये किमतीचे ५६ मोबाईल चोरून ...

Mobile thieves gang remanded in police custody till Friday | मोबाईल चोरट्यांच्या टोळीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी ()

मोबाईल चोरट्यांच्या टोळीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी ()

गोंदिया : आमगाव खुर्द-सालेकसा येथील भाटिया ट्रेडर्सचे शटर तोडून आठ लाख नऊ हजार ६११ रुपये किमतीचे ५६ मोबाईल चोरून नेणाऱ्या आरोपींकडून ८० मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणात एकूण आठ लाख २५ हजार ६११ रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी विष्णू खोकन विश्वास ( ३१), पिंकू नरेंद्र मिस्त्री (४०, रा. अरुणनगर-कोरंभीटोला), सूरज चित्तरंजन विश्वास (३०, ह.मु. शिवाजी चौक, केशोरी) यांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि.२२) पोलीस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान त्यांनी केलेल्या जुन्या गुन्ह्यांचा उलगडा होणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले यांनी सांगितले आहे.

आरोपी पिंकू मिस्त्री याने विष्णू विश्वास आणि सूरज विश्वास यांच्या स्कॉर्पिओ वाहनाने आमगाव खुर्द येथील मोबाईल दुकान गाठून तेथे मोबाईल व पैसे चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले मोबाईल क्रिष्णा निखिल मंडल (रा. दिनकरनगर) याच्या केशोरी येथील गणराज मोबाईल रिपेअरिंग सेंटर या दुकानात विक्रीसाठी ठेवले होते. यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० लाख २४ हजार ५५५ रुपयाचा माल जप्त केला होता. आता या चारही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

Web Title: Mobile thieves gang remanded in police custody till Friday