शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाचे झाले १४ लाख मनुष्य दिवस काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

मागेल त्याला काम देण्यासाठी केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अमंलात आणली. या योजनेच्या माध्यामातून ग्रामीण भागातील रस्ते, पांदण रस्ते, शेततळी, वनतळी, तलाव खोलीकरण, बांध्या खोलीकरणाचे काम केले जातात. दवरर्षी दिवाळी झाल्यानंतर मनरेगाच्या कामांना सुरूवात केली जाते.यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे मनरेगाच्या कामावरही परिणाम झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ८८ हजार ६६ कुटुंबाना रोहयोचे काम मिळाले.

ठळक मुद्दे८८ हजार कुटुंबांना मिळाला रोजगार : केवळ ५१ कुटुंबांना मिळाले शंभर दिवस काम

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागाचा विकास करणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेच्या कामांवरही यंदा कोरोनाचे संकट ओढावले आहे. दरवर्षी मनरेगाचे कोट्यवधी मनुष्य दिवस काम होत असताना यंदा केवळ १४ लाख २१ हजार मनुष्य दिवस काम गोंदिया जिल्ह्यात झाले आहे. यातील फक्त ५१ कुटुंबांना शंभर दिवस काम मिळाले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.मागेल त्याला काम देण्यासाठी केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अमंलात आणली. या योजनेच्या माध्यामातून ग्रामीण भागातील रस्ते, पांदण रस्ते, शेततळी, वनतळी, तलाव खोलीकरण, बांध्या खोलीकरणाचे काम केले जातात. दवरर्षी दिवाळी झाल्यानंतर मनरेगाच्या कामांना सुरूवात केली जाते.यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे मनरेगाच्या कामावरही परिणाम झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ८८ हजार ६६ कुटुंबाना रोहयोचे काम मिळाले. त्या कामांवर काम करणाºया मजुरांची संख्या १ लाख ३९ हजार ७६ होती. यातील मजुरांनी १४ लाख २१ हजार ६७७ मनुष्य दिवस काम केले आहे. यातील फक्त ५१ कुटुंबांना १०० दिवस काम मिळाले आहे. यातील ५ हजार २१८ कामे ही इंदिरा आवास योजनेची कामे आहेत.आमगाव तालुक्यातील ६ हजार ५२५ कुटुंबातील ९ हजार ७७० मजुरांनी १ लाख ३ हजार ६९६ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम एकाही कुटुंबाला मिळाले नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९ हजार ८३८ कुटुंबातील १८ हजार ४७६ मजुरांनी १ लाख ५८ हजार २८८ मनुष्य दिवस काम केले.यात शंभर दिवस काम ५ कुटुंबांना मिळाले आहे. देवरी तालुक्यातील ११ हजार २३ कुटुंबातील १९ हजार १८४ मजुरांनी १ लाख ७५ हजार ३४४ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम ५१ कुटुंबांना मिळाले आहे.गोंदिया तालुक्यातील १९ हजार ७७१ कुटुंबातील २६ हजार २६७ मजुरांनी २ लाख ८६ हजार २०७ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम ७ कुटुंबांना मिळाले आहे.गोरेगाव तालुक्यातील ६ हजार १८३ कुटुंबातील ९ हजार २२८ मजुरांनी ९६ हजार २६७ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम ३ कुटुंबांना मिळाले आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ९ हजार ६७२ कुटुंबातील १५ हजार २६१ मजुरांनी १ लाख ३१ हजार १३९ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम एकाही कुटुंबाला मिळाले नाही. सालेकसा तालुक्यातील ७ हजार ५०८ कुटुंबातील ११ हजार ६९७ मजुरांनी १ लाख ४५ हजार ७८० मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम ३ कुटुंबांना मिळाले आहे. तिरोडा तालुक्यातील १७ हजार ५४६ कुटुंबातील २९ हजार ८७८ मजुरांनी ३ लाख २४ हजार ९५६ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम २८ कुटुंबांना मिळाले आहे.सर्वाधिक घरकुलाची कामे अर्जुनी-मोरगाव तालुक्यातमनरेगाच्या माध्यमातून घरकुलांची कामे करण्यात आली. यात सर्वाधिक कामे ही घरकुलांची मनरेगाच्या माध्यमातून कामे करण्यात आली. त्यात अर्जुनी-मोरगाव तालुका अव्वल ठरला आहे. आमगाव तालुक्यात ३ घरकुलांची कामे, अर्जुनी-मोरगाव २ हजार ९४० कामे, देवरी तीन कामे, गोंदिया १ हजार ८५८, गोरेगाव १२, सडक-अर्जुनी ११, सालेकसा ६, तिरोडा ३८५ अशी एकूण ५ हजार २१८ घरकुलांची कामे मनरेगातून करण्यात आली आहेत.