आमदारांचा अंगरक्षक निलंबित

By Admin | Updated: May 9, 2016 01:51 IST2016-05-09T01:51:46+5:302016-05-09T01:51:46+5:30

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर ९ एप्रिल रोजी हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या

MLA's bodyguard suspended | आमदारांचा अंगरक्षक निलंबित

आमदारांचा अंगरक्षक निलंबित

मुख्य आरोपी फरारच : पोलीस प्रशासनाच्या हातात येईना
गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर ९ एप्रिल रोजी हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला महिनाभराच्या कालावधीत निलंबित करण्यात आले. अनंतराम मंगरू तुलावी (बक्कल नं. ३३६) असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
हॉटेलात पत्रपरिषद सुरू असताना भाजप नगरसेवक शिव शर्मा याने आमदार अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी १३ एप्रिलच्या रात्री ९.५६ वाजता अनिमेश ऊर्फ राज लक्ष्मीनारायण दुबे (२२, रा.गजानन कॉलनी) व गजेंद्र रामचरण साते (२१, रा.मरारटोली) यांना अटक केली. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांचा अंगरक्षक तुलावी ड्रायव्हर सोबत गाडीतच बसून होता. त्यामुळे हल्लेखोरांना थांबविता आले नाही किंवा त्यांना वेळीच अटक करता आली नाही.
ज्यावेळी घटना घडली त्या घटनेची माहिती अंगरक्षकाला झालीच नाही. त्या अंगरक्षकाला आ. अग्रवाल यांनीच गाडीवर राहायला सांगितले असे त्या कर्मचाऱ्याने दिलेल्या बयानात म्हटले आहे. परिणामी हल्लेखोर यशस्वी झाले. आपल्या कामात अनागोंदी कारभार केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करून देवरी उपमुख्यालयाशी जोडण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

दिनेश पालांदूरकरचेही निलंबन
गंगाझरी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार दिनेश पालांदूर याने नाकाबंदी दरम्यान एका ट्रॅक्टरला पकडून त्याच्या मालकाकडून पैसे घेतले. परंतु त्याला दोन दिवसानंतरही फोन करून पुन्हा पैशांची मागणी करीत ट्रॅक्टर जप्त करील अशी धमकी देत होता. त्यामुळे त्याला लाचलुचपत विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यालाही ३० एप्रिल रोजी निलंबित करून देवरी पोलीस उपमुख्यालयाशी जोडण्यात आले.

Web Title: MLA's bodyguard suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.