बोंडगावदेवी येथे मिशन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST2021-04-22T04:30:43+5:302021-04-22T04:30:43+5:30
बोंडगावदेवी : कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन समस्त ग्रामवासीयांनी सावधगिरी बाळगावी. ग्रामवासीयांचे आरोग्य मंगलदायी राहावे, गावात कोरोनाचा संक्रमण होऊ ...

बोंडगावदेवी येथे मिशन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण
बोंडगावदेवी : कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन समस्त ग्रामवासीयांनी सावधगिरी बाळगावी. ग्रामवासीयांचे आरोग्य मंगलदायी राहावे, गावात कोरोनाचा संक्रमण होऊ नये, यासाठी खबरदारीचा एक उपाय म्हणून संपूर्ण गाव सॅनिटायझरने फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे गावकऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण संबंधी मनात कोणतीही शंका निर्माण न करता लसीकरणासाठी समस्त गावकऱ्यांनी नि:संकोच पुढे यावे, असे आवाहन बोंडगावदेवी ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिमा बोरकर यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र चान्नाच्या वतीने येथील जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखान्यात मिशन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक जि.प. आयुर्वेदिक दवाखान्यात आरोग्यसेविका प्रतिभा राऊत, स्वाती लोहारे, आरोग्य सेवक दोनोडे, आशा स्वयंसेविका वर्षा रामटेके, सारिका रंगारी यांनी मिशन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान राबविला. कोव्हॅक्सिन लसीकरण शुभारंभाप्रसंगी सरपंच प्रतिमा बोरकर, ग्रामपंचायत सदस्य अमरचंद ठवरे, प्राचार्य नानेश्वर डोंगरवार, कृष्णा खंडाईत, नाशिकेत कापगते, संजय मानकर उपस्थित होते. कोरोनावर मात करणे ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. गावात कोरोनाबाधित निघाल्यास त्यांनी घरामध्ये गृहविलगीकरणात रहावे, प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी सकारात्मकतेनी पुढे यावे, घराबाहेर वारंवार निघू नये, असे मार्गदर्शन सरपंच बोरकर यांनी केले. परिसरातील बोदरा, अर्जुनी मोरगाव येथील नागरिकांनी लसीकरण करून घेतले.