जिल्ह्यात मिसाईल मॅनला आदरांजली
By Admin | Updated: October 19, 2015 02:09 IST2015-10-19T02:09:50+5:302015-10-19T02:09:50+5:30
भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. त्यांची जयंती प्रेरणा दिवस म्हणून थाटात साजरी करण्यात आली.

जिल्ह्यात मिसाईल मॅनला आदरांजली
गोंदिया : भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. त्यांची जयंती प्रेरणा दिवस म्हणून थाटात साजरी करण्यात आली.
पंचशिल हायस्कूल, मक्काटोला
बिजेपार : वाचनाने विद्यार्थ्यांचा मेंदू सशक्त होतो म्हणून त्यांनी दररोज अवांतर वाचन करावे असे आवाहन प्राचार्य व्ही.डी.मेश्राम यांनी केले.
पंचशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करताना आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आर.एम.मुनेश्वर, एम. बी. रंगारी, एस.एम.उके, यु. आर. सोनवाने, एम.जी.कांबळे उपस्थित होते. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या छायाचित्राचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीना ग्रंथालयातील उपलब्ध असलेल्या पुस्तक वितरीत करण्यात आले. याप्रसंगी सर्व प्रमुख अतिथींनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर यथोचित मार्गदर्शन केले. संचालन शिक्षक एन.आर.रामटेके तर आभार प्रा.वाय.एन.पाठक यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
कुवर तिलकसिंह शाळा, अर्र्जुुनी
खातिया : अर्जुनी येथील कुवर तिलकसिंह जिल्हा परिषद शाळेत माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. सोबतच हात धुवा कार्यक्रम घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी रावणवाडीचे केंद्रप्रमुख ए.आर.ठाकरे, प्रमुख पाहुणे म्हणून विषयतज्ञ ए.एस.हेंगडी व विजेंद्र मेश्राम उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. कलाम यांच्या छायाचित्रावर माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी पाहुण्यांनी कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले. हात धुवा कार्यक्रमात हात धुण्याचे पाच प्रकार समजाविण्यात आले. प्रास्तावीक मुख्याध्यापक के.एच.रहांगडाले यांनी, संचालन सी.जी.गजभिये यांनी तर आभार एस.आर.ब्राम्हणकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी वाय.एस.गौतम, एम.डी.डुंमरे व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.
जि.प. शाळा, बिरसी
आमगाव : मिसाईल मैन म्हणून जगात ओळखल्या जाणाऱ्या भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. त्या अनुषंगाने जि.प. प्राथमिक शाळा बिरसी येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. सदर दिनी चित्रकला स्पर्धा, वाचन कट्टा, अवांतर वाचन, प्रगट वाचन, मूक वाचन घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमगावचे केंद्रप्रमुख डी.एल.गुप्ता, ा्रमुख पाहुणे म्हणून गट साधन केंद्राचे विषयतज्ञ वशिष्ट खोब्रागडे, शा.व्य.समितीच्या उपाध्यक्षा बबीता बिसेन, सदस्या मुनेश्वरी पारधी, आशा भावे, ममता पटले, अंबुले, मुख्याध्यापक एल.यू.खोब्रागडे उपस्थित होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रम विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकाऱ्याने घेतले. पुस्तक पेढी योजनेतून पुस्तक वाटप केल्या जाते. त्यामुळे विद्यार्थ्याना वाचनाची गोडी निर्माण होते अशी माहिती एल.यू.खोब्रागडे यांनी दिली.
संचालन वर्षा बावनथडे तर आभार विकास लंजे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुरेश पटले, नरेश पटले, वंदना नागरीकर, लुसंगना उईके, सहेषराम सोनवाने, राजाराम राऊत, पुष्पा सोयाम या विद्यार्थ्यानी सहकार्य केले.
जि.प.शाळा, दरेकसा
दरेकसा : जि.प.शाळा दरेकसा येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यानची जयंती वाचन प्रेरणा दिवस मनोज विश्वकर्मा यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर ओकटे, मधुसूदन उईके, बालमुकुंद शेंडे, हगरू घासले, पिपरे हजर होते. यावेळी मार्गदर्शक यु.जी.पटले यांनी डॉ. कलामच्या जीवनावर मार्गदर्शन केले.
जि.प.हायस्कूल, करटी
करटी : जि.प.हायस्कूल करटी (बु.) येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून मुख्याध्यापक आर.टी.बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद चौरे, शिक्षणाधिकारी मोहबंशी यांनी शाळेला भेट दिली. संचालन अश्विनी राऊत यांनी केले. यशस्वीतेसाठी मांढरे, बन्सोड, भाजीपाले, सरोते आणि सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
जि.प.विद्यालय, परसवाडा
परसवाडा : स्थानिक जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परसवाडा येथे वाचन प्रेरणा दिन प्राचार्य डा.पी.आर.लोंढे यांच्या अध्यक्षस्थानी साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून सी.एम.फुलझेले, डी.एस.भगत होते. वाचन स्पर्धेत ५ ते १२ च्या सर्व विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. वाचन स्पर्धेत मोनिका भगत हीचा प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक स्वाती देव्हारे या विद्यार्थीनीने घेतला. यशस्वीतेसाठी प्रा.कवाने, प्रा.कावळे, प्रा. दुधाट, प्रा. पटले, लाड, कुर्वे, के.बी.पटले, खुटमोडे, गभणे यांनी केले. संचालन प्रा.एम.एच.पटले यांनी केले. आभार विजय काळे यांनी मानले.
सिद्धार्थ विद्यालय, डवकी
देवरी : दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून डवकी येथील सिद्धार्थ विद्यालय येथे वाचन प्रेरणा दिन मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयातील शिक्षक जे.टी.ठवरे, व्ही.टी.पटले, एन. जी. निखारे, के.आर. कोकावार, पी.जी. लांजेवार, वाय.बी.बोरकर, एच. टी. खोब्रागडे, आर.एस.बिसेन, एम.जे.टेंभरे, बी.बी.कुलसुंगे, शिक्षीका पी. डी. चव्हाण, आर.के.भुते, ए.एस.मारबते, एम.आर.टेंभुर्णीकर, एस.आर.जवंगाळ, एस.जी.मेश्राम उपस्थित होते.
जि.प.वरिष्ठ प्राथ. शाळा, सितेपार
कालीमाटी : सितेपार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल यांची ८४ वी जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. वाचनाचे महत्व, वाचन कसे करावे? काय किंवा कोणत्या पुस्तकांचे वाचन करावे याविषयी माहिती जैपाल ठाकूर, अंजन कावळे यांनी दिली. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन कैलास कावळे व मुख्याध्यापक जी.एस.येळे यांच्या हस्ते करण्यात आले. वाचन प्रेरणा उपक्रमात २६० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यशस्वीतेसाठी जैपाल ठाकूर, ए.एच.कावळे, आय.एस.बिसेन, एच. एम.रहांगडाले, वाय.एम.मोटघरे, एस. के.हंबर्डे, एस.यु.मसाने, डब्ल्यु.डी.माहुरे, एस.बी.मसाने यांनी सहकार्य केले.
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
अर्जुनी-मोरगाव : स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांच्या हस्ते माता सरस्वती तसेच डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. रामदास सूर्यवंशी, जे.डी.पठान, जुगलकिशोर राठी, छाया घाटे उपस्थित होते. प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांनी वाचनाने ज्ञानाचा दिवा सतत तेवत असतो असे प्रतिपादन केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्गात डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील पुस्तके तसेच अवांतर विषयाचे पुस्तक आणून सलग दोन तास वाचन केले. संचालन व आभार सुजीत जक्कुलवार यानी केले.
शहीद अवंती विद्यालय कोटजंमूरा
सालेकसा : शहीद अवंती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोटजंमूरा येथे मिसाईल मैन व भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती प्रेरणा वाचन दिन म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.आर.माहुले, प्रमुख अतिथी व्ही.एम.मानकर, एस.ए.मोहारे, सी. बी. नागपुरे, एच.पी.बंसोड, किशोर रहांगडाले, जी.आर.कुराहे, एम. के. नागपुरे उपस्थित होते. संचालन व आभार माधुरी गौतम यांनी केले. यशस्वीतेसाठी एच.बी.माहुले, बुरले, नागपुरे, दमाहे, बल्हारे यांनी सहकार्य केले.
डॉ. भाभा विद्यालय, झरपडा
अर्जुनी-मोरगाव : डॉ. कलाम यांची जयंती मुख्याध्यापक एन. ए. नाकाडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक पी. एस. बारसागडे, आर. एस.लंजे व डी.टी.मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी पायल आरसोडे व रोहीत लंजे या विद्यार्थ्यांनीे शिक्षक आर.एस.लंजे व मुख्याध्यापक नाकाडे यांनी डॉ. कलामांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन पी.बी.नानोटी यांनी केले. यशस्वीतेसाठी जी.पी.परशुरामकर, के. एच. झोडे, डी.के.मुंडले, एन. ए. कापगते, ए.बी.लांजेवार, बी.एस.सार्वे, सी.एच.ठाकरे, एच.एन.नाकाडे, विनोद मस्के, आर.के.कापगते, एच. एस. इनवाते एम.जे.येळेकर, आर.जी.बघेले, एस.पी.डेकाटे व एन.डी.मेश्राम यांनी सहकार्य केले.
जिल्हा परिषद शाळा, बिरसी
खातिया : जिल्हा परिषद शाळा बिरसी येथे वाचन प्रेरणा दिवसानिमित्त डॉ.अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस. पी. मेश्राम व प्रमुख पाहुणे म्हणून विषयतज्ञ अनिता ठेंगडी उपस्थित होते. यावेळी शिक्षक एस.के.मिश्रा, डी.टी.खंडाईत उपस्थित होते. संचालन ए.के.मिश्रा यांनी तर आभार मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाची व्यवस्था राजू-मिना मंचच्या विद्यार्थ्यांनी केली.
नमाद महाविद्यालय
गोंदिया : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती प्राचार्य योगेश नासरे यांच्या अध्यक्षतेसाठी साजरी करण्यात आली. यावेळी प्रा.के.टी.बिसेन, मुख्य वक्ता प्रा. कपिल चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. यादव सूर्यवंशी, डॉ. कृष्णा मेश्राम उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. संजय जगने यांनी केले.
यावेळी नेहा आहुजा, सानिया शेख, मेहरुनिसा पठान, रमाकांत राणे, राहुल जैन, भूमिका तिडके, मोहित मनुजा, खुशबू तिवारी यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात प्रा. उर्विल पटेल, प्रा. कविता पटेल प्रा. गीता पटेल, प्रा. बालपांडे, प्रा. प्रविण टेंभेकर, प्रा.बबन मेश्राम, प्रा. विजय मोहबे उपस्थित होते. संचालन नेहा सजनानी व ममता नेहलानी यांनी तर आभार प्रा. रवी रहांगडाले यांनी मानले. यशस्वीतेसाठी हुस्ना शेख, पल्लवी पांडे, सहबाज पठान, कल्याणी कुथे, अंतिक बंधनवार यांनी सहकार्य केले.
राष्ट्रीय कला महाविद्यालय, सावरी
गोंदिया : दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती शिक्षक बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून चौधरी उपस्थित होते. संचालन शालू बिसेन यांनी केले. या कार्यक्रमाला स्काऊट आणि गाईड या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे आयोजन स्काऊट विभागाचे मुख्य शिक्षक बिसेन, गाईड विभागाच्या सरजारे यांनी केले. विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्याविषयी वाचन केले.
एस.एस.म्यु.गर्ल्स हायस्कूल
गोंदिया : येथील एस.एस.म्यु. गर्ल्स हायस्कूल शाळेच्या प्रांगणात भारताचे मिसाईल मैन व माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी एम.एस.फुंडे, वरिष्ठ शिक्षिका जी.एस.ठाकुर, नंदगळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांचा जिवनावर प्रकाश टाकला. शाळेतील मुलींच्या विकासासाठी वेगवेगळे कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले. प्रकट वाचन, भित्तीपत्रिका, भाषण, स्फूर्त भाषण स्पर्धा घेण्यात आली. संचालन बी.बी.अग्रवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी गाडेकर, मोटघरे, सारंगपुरे, यादव, तुरकर, वैद्य, राणे, तुमसरे, सुखनानी, नंदघळे, लिल्हारे, यादव यांनी सहकार्य केले.
मंगलम मुक-बधिर निवासी शाळा
गोंदिया : येथील मंगलम मुक बधीर निवासी शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती मुख्याध्यापिका रेशु शुक्ला यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. मुलांना डॉ. कलाम यांच्या जीवनाविषयी सांकेतिक भाषेत माहिती दिली. त्याच्या जयंती निमित्ताने शाळेमध्ये मुलांना वेगवेगळ्या गोष्टीची पुस्तके देऊन त्याच्या पध्दतीने वाचन घेऊन वाचन प्रेरणा दिवस तसेच सर्व विद्यार्थ्यांना हात धुवा कार्यक्रम घेण्यात आला.
असिम सराफ अॅकेडमी
तिरोडा : भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन दिवस म्हणून तिरोडा येथील असिम सराफ अॅकेडमीत साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य मनिष तिवारी, अतिथी म्हणून वर्षा सोनी, सचिव सविता तुरकर, शकुण बिसेन, पंकज सराफ उपस्थित होते. संचालन अपर्णा डुंबरे यांनी केले. यशस्वीतेसाठी भारती राणे, मनिषा, रोशनी नागपुरे, किर्ती असाटी, शेंडे, रामटेके यांनी सहकार्य केले.
एस.एम.पटेल कॉलेज
गोंदिया : गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाद्वारे संचालित एस.एम.पटेल कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती प्राचार्य रिजवाना अहमद यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. ज्योति तिवारी, हर्षल डबाले, सृष्टी काथवटे यांनी कलाम यांच्यावर माहिती दिली. संचालन प्रा. किंजल मेहता यांनी केले, यशस्वीतेसाठी प्रा. विणा आचार्य, प्रा. जस्मीन सेठ, प्रा. नुतन रहांगडाले यांनी सहकार्य केले.