खनिज माफियांवर तहसीलदारांची गाज
By Admin | Updated: March 7, 2016 01:33 IST2016-03-07T01:33:44+5:302016-03-07T01:33:44+5:30
फोफावत असलेल्या गौन खनिजाच्या अवैध कारभारावर अंकुश बसावा यासाठी आमगावच्या तहसीलदारांनी अवैध खनिज माफियांवर धाडसत्र सुरू केले आहे.

खनिज माफियांवर तहसीलदारांची गाज
गोंदिया : फोफावत असलेल्या गौन खनिजाच्या अवैध कारभारावर अंकुश बसावा यासाठी आमगावच्या तहसीलदारांनी अवैध खनिज माफियांवर धाडसत्र सुरू केले आहे. १ ते ५ मार्च या कालावधीत तहसीलदारांनी २२ प्रकरणांची नोंद केली असून ३.२२ लाखांचा दंड ठोठावला आहे.
खनिजाच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे. या वाढत्या व्यवहारामुळे शासनाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र कुणीही याला नियंत्रणात आणण्यासाठी पुढे येत नाही. मात्र आमगावच्या तहसीलदारांनी खनिज माफीयांवर पाश कसायला सुरूवात केली आहे. तहसीलदार राजीव शक्करवार यांनी अवैध खनिज कारभारावर १ ते ५ मार्चदरम्यान धाडसत्र राबविले. यात त्यांनी खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या १२ वाहनांना पकडले. तर १० अवैध विट भट्यांवर धाड घालून एकूण २२ प्रकरणांची नोंद केली.
या प्रकरणांत त्यांनी संबंधितांवर तीन लाख २२ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. तहसीलदर शक्करवार यांच्या या धाडसत्राने खनिज माफीयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या माफियांकडून तहसीलदारांवर पाळत ठेवली जात असल्याचीही माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)