‘त्या’ मार्गाची मंत्र्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 21:52 IST2017-11-19T21:51:59+5:302017-11-19T21:52:18+5:30

प्रमुख राज्य महामार्ग ११ वर ठिकठिकाणी असलेल्या खड्यांची रविवारी सकाळी राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली.

The ministers of the 'Way' route surveyed | ‘त्या’ मार्गाची मंत्र्यांनी केली पाहणी

‘त्या’ मार्गाची मंत्र्यांनी केली पाहणी

ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळाचे सावट : महसूलमंत्र्यांनी शेतकºयांकडे फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : प्रमुख राज्य महामार्ग ११ वर ठिकठिकाणी असलेल्या खड्यांची रविवारी सकाळी राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. लोकमतने रविवारी प्रकाशित केलेल्या बातमीतील जागेची पाहणी केली हे विशेष.
ना.पाटील महसूल मंत्री असतांना सुध्दा त्यांनी केवळ रस्त्यांचीच पाहणी करुन जनतेचा हिरमोड केला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.
‘मंत्र्यांच्या धास्तीने रस्त्यांना नववधूचा साज’ या मथळ्याखाली अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा लोकमतने रविवारच्या अंकात मांडली. मंत्री येणार म्हणून प्रमुख राज्य महामार्ग ११ वर ज्या जोमाने काम सुरु होते. त्यावरुन तो नववधूचा साज असल्याचा भास होत होता मात्र स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ डांबर मिश्रीत गिट्टीचे ठिगळ लावून मंत्र्यांच्या वाहनाचे हेलकावे कमी केले. मंत्र्यांच्या वाहनाची क्षती होऊ नये हा नियम कटाक्षाने पाळल्याचे जाणवले. या घटनाक्रमावरुन मंत्री महोदय, आपण या क्षेत्रात वारंवार या, आमचे चांगभल होईल या समजीने तालुकावासीय सुखावले.
ना.पाटील यांचे गोंदिया जिल्हा दौराप्रसंगी तमाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी या दौºयात रस्त्यांचा आढावा घेतला. मात्र त्यांनी राज्य महामार्ग क्रं. ११ वर पडलेल्या खड्यांच्या डागडूजीसंदर्भात अधिकाºयांना काय निर्देश दिले ते कळू शकले नाही. उपविभागीय अभियंता सोनूने यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. नाना पटोले हे सध्या पूर्व विदर्भात शेतकºयांच्या मुद्यावर केंद्र व राज्य सरकारवर आगपाखड करीत आहेत. ते स्वपक्षावरच टिका करीत असल्याने त्यांचे स्थान डगमळीत समजले जात आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात भाजपच्या मंत्र्याचे दौरे वाढल्याचे बोलल्या जात आहे. अशा परिस्थितीत ना. पाटील हे महसूल मंत्री या नात्याने शेतकºयांशी संवाद साधतील ही अपेक्षा फोल ठरली.
महसूल अधिकारी नव्हते
ना. चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री तर आहेतच शिवाय महसूल मंत्री सुध्दा आहेत. महसूल मंत्री हे मंत्रीमंडळात मुख्यमंत्र्यानंतरचे उच्चपद आहे. मात्र ना. पाटील यांनी रस्ते पाहणीला प्राधान्यक्रम दिले. त्याच्या या दौºयात महसूल विभागाचे अधिकारी हजर नव्हते. अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार सी.आर.भंडारी हे स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात आढाव्यासाठी गेले होते. राज्य महामार्ग क्रं.११ वर वादळी पावसामुळे धानपिकांचे मोठे नुकसान झाले होते. याच मार्गाने ना. पाटील गोंदियाकडे गेले त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करुन शेतकºयांना दिलासा देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी या महामार्गावरील शेतीची पाहणीच केली नाही, असा शेतकºयांचा आरोप आहे. यामुळे शेतकºयांचा हिरमोड झाला आहे.
भाजपच्या पत्रिकेतून पटोले बाद
सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव व गोरेगाव तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सडक-अर्जुनी येथे पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. परिणय फुके, विधानपरिषदेचे आ. अनिल सोले यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत आहेत मात्र खा. पटोले यांना भाजप कार्यकर्त्यानी डावलल्याचे दृष्टीस येते. गोरेगावच्या पत्रिकेतही नाना पटोले यांना बाद करण्यात आले होते. यावरून नाना भाजपची चांगलीच गोची करीत असल्याचे लक्षात येत आहे.
 

Web Title: The ministers of the 'Way' route surveyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.